ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; बाधितांची संख्या 78 - Yavatmal corona updates

जिल्ह्यात आज दिवसभरात 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात नेर येथील 10 जण, दिग्रस आणि वणी येथील प्रत्येकी दोन तर एक दारव्हा येथील व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात 15 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; बाधितांची संख्या 78

author img

By

Published : Jun 23, 2020, 8:01 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात गत दोन तीन दिवसांपासून 63 वर स्थिरावलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मंगळवारी अचानक वाढ झाली. आज दिवसभरात 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात नेर येथील 10 जण, दिग्रस आणि वणी येथील प्रत्येकी दोन तर एक दारव्हा येथील व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 26 रिपोर्ट प्राप्त झाले आहेेेत. यापैकी 15 पॉझिटिव्ह तर 11 निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये दारव्हा येथील सहा, नेर येथील तीन, वणी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 78 आहे.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3हजार 971 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3 हजार 673 प्राप्त तर 298 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 247 आहे. यापैकी 78 एक्टिव पॉझिटिव्ह असून 161 लोकांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात 8 लोकांच्या मृत्यूची जिल्ह्यात नोंद असून सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3 हजार 452 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.