ETV Bharat / state

कोरोनाबाबतची भीती लोकांच्या मनातून दूर करा; विधानसभा अध्यक्षांकडून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी

काही नागरिकांचा कोरोनाच्या भीतीमुळे घरातच मृत्यू झाला आहे. असे आकडे समोर येत नाही. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करायचा असेल तर लोकांच्या मनातून कोरोनाबाबतची भीती पूर्णपणे दूर करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. नाना पटोलेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आढावा घेतला.

नाना पटोलेंनी रूग्णालयाची पाहणी केली
नाना पटोलेंनी रूग्णालयाची पाहणी केली
author img

By

Published : Oct 4, 2020, 8:28 PM IST

यवतमाळ - कोरोनाचे संकट हे एका युध्दासारखे आहे. या संकटातून लोकांचा जीव वाचविणे हेच आमचे दायित्व आहे. रेकॉर्डला असलेलेच आकडे आपल्याला दिसतात. मात्र काही नागरिकांचा कोरोनाच्या भीतीमुळे घरातचं मृत्यू झाला आहे. असे आकडे समोर येत नाही. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर कमी करायचा असेल तर लोकांच्या मनातून कोरोनाबाबतची भीती पूर्णपणे दूर करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. नाना पटोलेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आढावा घेतला.

कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पहिल्या अडीच महिन्यात एकही मृत्यू नव्हता. मात्र यवतमाळचा मृत्युदर आज 3.1 टक्के आहे. याबाबत पटोलेंनी खंत व्यक्त केली. नाना पटोले म्हणाले, 2.8 टक्के हा सरासरी मृत्यूदर आहे. त्यापेक्षा मृत्युदर जास्त असणे हे आपले अपयश आहे. हा दर कमी करण्यासाठी लोकांच्या मनातून कोरानाबाबतची भीती घालविणे, हे प्रशासनाचे पहिले प्राधान्य असले पाहिजे. कोरोना हा आजार फुफ्फुसाशी निगडीत आहे. फुफ्फुसाला दुसरा पर्याय नाही. तीन– चार दिवस हा आजार अंगावर काढला तर आपले काहीही होऊ शकते. या सर्व प्रक्रियेमधून मी गेलो आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच आपली चाचणी करून घ्यावी. जिल्ह्यात चाचण्या करण्याची प्रक्रिया वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ऑक्सिजनवरील रुग्णाला वाचवणे शक्य आहे. त्याला व्हेंटिलेटरवर जाऊ देऊ नका. तसेच रुग्णालयाची गर्दी कमी करायची असेल तर रुग्ण घरीच बरा झाला पाहिजे, याबाबत प्रशासनाने निश्चित धोरण आखावे. तसेच खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल काढले जात आहे. त्यामुळे रुग्णांची लूट थांबवणे गरजेचे आहे. कोरोनाबाधितांवर शासनाकडून मोफत औषधी आणि उपचार आहे, हा संदेश नागरिकांत गेला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभारायच्या असेल तर शासनाच्या निधीची वाट न बघता कंपन्यांचा सीएसआर फंड उपयोगात आणावा. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एम, देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.