ETV Bharat / state

विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडून सानिकाच्या शिक्षणाची जबाबदारी; थेट घरी येऊन केली मदत - नाना पटोलेंची सानिका पवारला मदत

विधानसभा अध्यक्षांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलगी सानिका पवार हिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. रविवारी त्यांनी हिवरी येथील तिच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. तसेच तिच्या शिक्षणाचा खर्चही सुपूर्द केला.

नाना पटोलेंकडून सानिकाच्या शिक्षणाची जबाबदारी

author img

By

Published : Oct 5, 2020, 7:28 AM IST

यवतमाळ - आर्थिक विवंचनेतून सुधाकर पवार या शेतकरी बापाने आत्महत्या केली होती. त्याचवेळी दहावीच्या परीक्षा सुरू होत्या. मात्र, घरात वडिलांचा मृतदेह असताना वडील गेल्याचे दुख बाजुला सानिका पवार या विद्यार्थिनीने दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत तिने तब्बल ९७.६० टक्के गुण प्राप्त केले होते. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी तिच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली होती. रविवारी त्यांनी सानिकाच्या घरी भेट देऊन तिचा शैक्षणिक खर्च सुपूर्द केला.

पटोलेंकडून सानिकाच्या शिक्षणाची जबाबदारी

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे रविवारी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी वडिलांच्या आत्महत्येचे दुख बाजुला ठेऊन दहावी उत्तीर्ण होणाऱ्या सानिका पवारच्या घरी भेट दिली. तिच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर नाना पटोले यांनी गुणवंत सानिकाशी विधानभवनातून दूरध्वनीने संपर्क साधून तिचे कौतुक केले होते. तसेच लवकरच भेटायला तुझ्या घरी येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी नाना पटोले यांनी हिवरी येथील सानिकाच्या घरी भेट देऊन तिला शाबासकी दिली. तसेच तिच्या शिक्षणाचा खर्चही स्वीकारला.

नाना पटोलेंकडून सानिकाच्या शिक्षणाची जबाबदारी

सानिकाच्या इयत्ता 11वीच्या पुढील शिक्षणासाठी लातूरमधील शाहू महाराज महाविद्यालयात प्रवेश करून देण्यात आला आहे. तसेच चालू वर्षीचा एक लाख ३० हजार रुपयांचा शैक्षणिक खर्च तिला धनादेशाद्वारे सोपविण्यात आला. यापुढील तिच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी पटोले यांनी स्वीकारली आहे. तिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून प्रशासकीय सेवेत यावे ही तिची ईच्छा पूर्ण होईल, असा आशीर्वादही पटोले यांनी यावेळी सानिकाला दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.