यवतमाळ - शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सध्या 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आले असून 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्याने दुसरा डोज देण्यात येणार आहे. जिल्ह्यात दुसऱ्या डोजसाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यात लस उपलब्ध करणे, हे आपले प्राधान्य आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
20 नवीन रुग्णवाहिका लवकरच -
ग्रामीण भागात अगदी प्राथमिक आरोग्य स्तरावरसुध्दा आयसोलेशन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य परिस्थती लक्षात घेता लहान मुलांच्याबाबतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्त्री रुग्णालयात नियोजन करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 16 नवीन रुग्णवाहिका घेण्याला मंजूरी देण्यात आली असून भविष्यातही 20 नवीन रुग्णवाहिका घेतल्या जातील. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड सेंटर, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आदी ठिकाणी पाणी तसेच स्वच्छतेची व्यवस्था प्राधान्याने करावी. कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला डीसीएचसी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच उपचाराची निश्चित पध्दती काय असावी, यासाठी क्लिनीकल एक्सलन्स कार्यक्रम खालच्या स्तरावर राबविण्यासाठी डॉक्टरांचे वेबीनार घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरणात जिल्ह्यात बेडची व्यवस्था, उपलब्ध ऑक्सिजन साठा, पीएसए प्लाँट, रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्धता आदींबाबत माहिती दिली.
हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट? मंत्री यशोमती ठाकुरांनी व्यक्त केली शंका