ETV Bharat / state

दगडाने ठेचून वृद्धाची हत्या, घाटंजी तालुक्यातील शिवनीमधील घटना - यवतमाळ क्राईम न्यूज

एका व्यक्तीची अज्ञाताने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घाटंजी तालुक्यातील शिवनीमध्ये घडली आहे. मारोती भवानी आत्राम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

Murder of an old man
दगडाने ठेचून वृद्धाची हत्या
author img

By

Published : Nov 17, 2020, 4:58 PM IST

यवतमाळ - एका व्यक्तीची अज्ञाताने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घाटंजी तालुक्यातल्या शिवनीमध्ये घडली आहे. मारोती भवानी आत्राम (65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मंगळवारी सकाळी हत्या झाल्याचे समोर आले.

जादू-टोण्याच्या कारणाची शक्यता

सोमवारी दिवाळी पाडवा होता. पाडव्याच्या दिवशी कोलाम समाजाच्या वतीने दंडारीचा मोठा उत्सव शिवनी गावात साजरा केला जातो. त्या दिवशी मारोती आत्राम हे शेतात एकटेच होते. ही संधी साधून अज्ञात आरोपीने दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. या प्रकरणी त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जादू-टोण्याच्या कारणासाठी वडिलांची हत्या करण्यात आल्याचा संशय त्याने व्यक्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - शेतात काम करणारे पिता-पुत्र बिबट्याच्या हल्ल्यात ठार, परिसरात दहशत

हेही वाचा - औरंगाबादमधील सर्व धर्मिय प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.