यवतमाळ - जिल्ह्यातील मारेगाव येथे एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आली. कोमल उमेश उलमाले (30), श्रुती उमेश उलमाले (दीड वर्ष, रा.मारेगाव) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी रात्रीपासून होती बेपत्ता -
विवाहित महिला कोमल उमेश उलेमाले ही तिच्या दीड वर्षाच्या श्रुती उलेमाले हिला घेऊन घरातील सर्व झोपेत असताना रात्री दहा ते अकरा वाजताच्या सुमारास दरम्यान निघून गेली होती. तिचा शोध घेतल्यानंतर सकाळी घरच्यांनी मारेगाव पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार देऊन सगळीकडे शोधाशोध सुरू केली.
दरम्यान मृताच्या घराकडील पुरके आश्रम शाळे नजीक थेरे यांच्या शेतातील विहिरीजवळ मृताच्या पायातील चपला आढळल्याने विहिरीत गळ टाकून शोध घेतला. त्यावेळी विहिरीत माय लेकीचा मृतदेह आढळला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास मारेगाव पोलीस ठाणे करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्या करणे हा सध्या गुन्हा नाही. मात्र अशा पद्धतीने आत्महत्या होत आहेत. त्या टाळणे गरजेचे आहे. राज्यात काही ठिकाणी अशा आत्महत्या होत आहेत. ही चिंतेची बाब आहे. आज दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी अशीच एक घटना बीडमध्ये घडली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.