ETV Bharat / state

बोरी येथे स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला मनसेचा घेराव; 720 खाते पुनर्गठन प्रकरणे प्रलंबित - मनसे घेराव स्टेट बँक बोरी

गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास 720 कर्ज खाते पुनर्गठन प्रकरणे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. एका महिन्याच्या आत सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी चावरे यांनी दिले आहे.

MNS
बोरी येथे स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला मनसेचा घेराव
author img

By

Published : Dec 7, 2019, 8:01 AM IST

यवतमाळ - दारव्हा तालुक्यातील बोरी येथे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचे पुनर्गठन करण्यासाठी स्टेट बँक गेल्या 6 महिन्यांपासून टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. काल(7 डिसेंबर) मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार आणि अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी बोरी स्टेट बँकेवर धडक दिली. यावेळी, बँक व्यवस्थापक चावरे यांना २ तास घेराव घालण्यात आला. दरम्यान, एका महिन्याच्या आत सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी चावरे यांनी दिले आहे.

बोरी येथे स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला मनसेचा घेराव

चावरे हे वशिलेबाजीने लोकांची कामे करतात आणि आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय काम करत नाही, अशा स्वरूपाचे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला होता. मनसेने काही कर्ज प्रकरणे कागदपत्रांची पूर्तता न करताच मंजूर केल्याचा आरोप बँकेवर केला आहे. या प्रकारचे एक उदाहरणदेखील त्यांनी यावेळी दिले. गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास 720 कर्ज खाते पुनर्गठन प्रकरणे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.

हेही वाचा - मुरबाड एसटी आगार प्रमुखाच्या निलंबनाच्या मागणीसाठी अधिकाऱ्याला घेराव

याप्रसंगी, सर्व प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याची मागणी लावून धरण्यात आली. त्यानंतर, चावरे यांनी यवतमाळ मुख्य शाखेचे ढोले यांच्याशी फोनवर चर्चा करून एका महिन्याच्या आत सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Intro:Body:यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील बोरी येथे शेतकऱ्यांच्या 6 महिन्यांपासून पुनर्गठनच्या केसेस करण्यासाठी स्टेट बँक टाळाटाळ करीत होते. आज शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी बोरी स्टेट बँकेवर धडक दिली. या ठिकाणी मनसेने शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरताच यवतमाळ येथे निघून गेलेले बँक व्यवस्थापक चावरे याना तात्काळ बोलविण्यात आले.या ठिकाणी तब्बल २ तास त्यांना घेराव टाकण्यात आला. शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पुनर्गठनच्या केसेस निकाली काढण्यासाठी बँकेच्या रोज खस्ता खाव्या लागत होत्या. बँक व्यवस्थपक चावरे हे वशीलबाजीने लोकांची कामे करतात आणि आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय काम करत नाही अश्या स्वरूपाचे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी या प्रसंगी केला. या घेरावात मनसेने काही कर्ज प्रकरणे कागदपत्रांची पूर्तता न करताच मंजूर केल्याचा आरोप करीत एक प्रकरण व्दारे ते सिद्ध करून दाखविले. गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास 720 केसेस मंजुरीसाठी प्रलंबित होती. याप्रसंगी वरील सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची मागणी लावून धरण्यात आली. यावर स्टेट बँक यवतमाळ मुख्य शाखेचे ढोले यांच्याशी फोन द्वारे चर्चा करून एक महिन्याच्या आत सर्व प्रकरणे निकाली काढण्याची घोषणा घेरावादरम्यान चावरे यांनी केली.

बाईट - अनिल हमदापुरे, मनसेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.