यवतमाळ- आर्णी शहरातील पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. कोट्यावधीची योजना मंजूर झाली, मात्र अद्यापही निविदा प्रक्रिया सुरू झाली नाही. दोन मार्चला जीआर काढून सात दिवसात निविदा काढा, ९० दिवसात कार्यादेश द्या व ९१ दिवशी योजनेला सुरवात करा असे आदेश देण्यात आले होते. मात्र, यातील कोणतेच काम करण्यात आले नाही. म्हणजे सर्व पदाधिकारी तीने महिने का गोट्या खेळत होते का? असा सवाल उपस्थित करत आर्णी मनसेच्या वतीने नगरपालिकेत 'गोट्या खेळो आंदोलन' करण्यात आले.
नगरपरिषदेने कोणत्याही योजनेची अंमलबजावणी केली नाही. आता या योजना परत जाण्याच्या मार्गावर आहे. योजना परत जाण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. याच विषयावर यापूर्वी मनसेने निविदा काढा व याेजना मार्गी लावा असे निवेदन दिले होते. त्यामुळे आज (शुक्रवारी) मनसेच्या वतीने 'गोट्या खेळो आंदोलन' करण्यात आले. मनसे आर्णी तालुकाध्यक्ष सचिन येलगंधेवार यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा-पुण्यात वर्षभरात 20 हजार बालके कोरोना संसर्गित; सध्या 54 बालकांवर उपचार सुरू