ETV Bharat / state

धक्कादायक; मनसेने बँक व्यवस्थापकाला चोपले, गरीबांची लुबाडणूक केल्याचा आरोप

अतिरिक्त व्याजाचे आमिष दाखविल्यामुळे सर्वसामान्य जनतेनी आपल्या मेहनतीच्या पैशाची गुंतवणूक या बँकेत केली. मात्र गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत देण्यास बँक टाळाटाळ करू लागली. त्यामुळे मनसैनिकांनी बँक व्यवस्थापकाला चांगलाच चोप दिला.

author img

By

Published : Jul 4, 2019, 7:03 PM IST

बँक व्यवस्थापकाला बोलताना मनसे कार्यकर्ते

यवतमाळ - गरीबांचा पैसा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापकाला मनसैनिकांनी चांगलेच चोपले. वणी येथील सहारा बँकेच्या कार्यालयात ही घटना घडली आहे. बँक व्यवस्थापकाला चोपल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

वणी येथे सहारा बँकेचे कार्यालय आहे. या बँकेच्या माध्यमातून आर. डी. तसेच डिपॉझीट गोळा करण्याचे काम करण्यात येत होते. अतिरिक्त व्याजाचे आमिष दाखविल्यामुळे सर्वसामान्य जनतेनी आपल्या मेहनतीच्या पैशाची गुंतवणूक या बँकेत केली. मात्र, आरडीचा कालावधी संपल्यानंतरही गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत देण्यास बँक टाळाटाळ करू लागली. याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उबंरकर हे कार्यकर्त्यांसह बँकेत आले.

बँक व्यवस्थापकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राजू उबंरकर यांनी बँक व्यवस्थापकाला कार्यालयातच चोप दिला. या घटनेमुळे बँक परिसरात चांगलीच खळबळ उडाली. गुंतवणूकदारांचे पैसे लवकर परत करा, अन्यथा यापुढे आपली मनसेशी गाठ असल्याची तंबी उबंरकर यांनी बँक व्यवस्थापकाला दिली.

Intro:बॅंक मॅनेजरला मनसेकडुन चोप
सामान्यांची आर्थिक लुबाडणुक केल्याप्रकरणी मारहाणBody:यवतमाळ : अतिरिक्त व्याजाचे आमिष दाखवत सर्वसामान्य जनतेचा पैसा देण्यास टाळाटाळ करणा-या बॅक मॅनेजरला मनसेकडुन चांगलाच चोप देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वणी येथील सहारा बॅंकेच्या कार्यालयात ही घटना घडली आहे.
जिल्ह्यातील वणी येथे सहारा बॅंकेचे कार्यालय आहे. या बॅकेच्या माध्यमातुन आर.डी.तसेच डिपॉझीट गोळा करण्याचे काम करण्यात येत होते. अतिरिक्त व्याजाचे आमिष दाखविल्यामुळे सर्वसामान्य जनतेनी आपल्या मेहनतीच्या पैश्याची गुंतवणूक या बॅकेत केली.माञ आर.डी.चा कालावधी संपल्यानंतरही गुंतवणूक करणा-यांना पैसे परत देण्यास बॅंक टाळाटाळ करू लागली. याप्रकरणाचा जाब विचारण्याकरीता मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजु उबंरकर हे बॅंकेत आलेहोते. माञ संबधित बॅंक मॅनेजरकडुन समाधानकारक उत्तर मिळत नसल्याच पाहुन राजु उबंरकर यांनी बॅंक मॅनेजरला कार्यालयातच सर्वासमक्ष चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे बॅंक परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. गुंतवणुकदारांचे पैसे लवकर परत करा अन्यथा यापुढे
आपली मनसेसी गाठ आहे अशी तंबी राजु उबंरकर यांनी बॅंक मॅनेजरला दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.