नवी मुंबई : नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या (Rabale Police Station) हद्दीत, न विचारता मिठाई खाल्ल्यानं एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दुकानदारासह तिघांना अटक केली आहे.
काय आहे प्रकार : रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. रबाळे येथील एका दुकानात जुईल खान (25) नावाचा तरुण आणि त्याचा मित्र पाण्याची बाटली घेण्यासाठी गेले होते. जुईल खान याने मालकाला न विचारता दुकानातील मिठाईचा बॉक्स उघडून त्यातील मिठाई खाल्ली होती. याचा राग दुकानाचा मालक अनिल कुमार (40) यांना आला. त्यावरुन जुईल खान आणि दुकान मालक यांच्यात प्रचंड वाद झाला. त्यानंतर दुकानदार अनिल कुमार याने त्याचे दोन साथीदार सुरशिंग जबदा आणि सुरेश जाबर यांना बोलावले. या तिघांनी मिळून जुईल खानला लोखंडी पाईपने प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत जुईल खानचा मृत्यू झाला.
तिन्ही आरोपींना पोलिसांनी केलं गजाआड : जुईल खानला दुकानदारासह तिघांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळं दुकानदार आणि त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानदार आरोपी अनिल कुमार आणि त्याचे दोन साथीदार सुरशिंग जबदा (30) आणि सुरेश जाबर(35) या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल यांनी दिली.
किरकोळ कारणावरुन राग येऊन हाणामारीच्या घटना अलिकडच्या काळात नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र त्याहीपुढे जाऊन थेट हत्या करण्याची प्रकरणंही अलिकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळे समाजात भीतीचं वातावरण पसरतय, त्याचवेळी पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे.
हेही वाचा -
- सासू सासऱ्यानंच केला जावयाचा 'गेम'; धावत्या एस टी बसमध्येच केला खून, मृतदेह सोडला बस स्थानक परिसरात - Man Murder In Running ST Bus
- तीन मुलांची आई पतीला सोडून राहत होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये; प्रियकरानं चिमुकल्याचं डोक आपटून केला खून - Man Killed Live In partners Boy
- जादूटोण्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या; पाच आरोपींना अटक - Mass Murder In Sukma