यवतमाळ - येथील शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचे तांडव सूरू आहे. दररोज 30 पेक्षा जास्त मृत्यू होत असून, आता मृतदेह गहाळ होण्याचे प्रकार पुढे येत आहे. असचा काहीसा प्रकार शासकीय रुग्णालयात घडला असून, याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दाखल
दरम्यान पिडीत कुटूंबियांनी याबाबत ओपीडी तसेच इतर डॉक्टर कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र प्रत्येकाडून विरोधाभासी उत्तरे मिळाली. रात्री उशारीपर्यत मृतदेह शोधण्यासाठी कुटूंबीयांनी प्रयत्न केले. त्यानंतर 22 एप्रिलला पुन्हा शवविच्छेदन गृहात मृतदेहाचा शोध घेतला, मात्र सांयकाळपर्यत शोध लागला नाही. त्यावरुन रुग्णालयातील संबंधीत अधिकाऱ्यांवर याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - राज्यातील सर्व रुग्णालयांचे होणार ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडिट’; मुख्य सचिवांचे निर्देश