ETV Bharat / state

Coronavirus : एमबीबीएसच्या 200 विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार, 31 मार्चनंतर परीक्षा घेण्याची मागणी

author img

By

Published : Mar 17, 2020, 10:28 AM IST

यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधितांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या 200 विद्यार्थ्यांनीही 31 मार्चनंतर परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करत परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.

Corona virus
एमबीबीएसच्या 200 विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

यवतमाळ - राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या 200 विद्यार्थ्यांनीही 31 मार्चनंतर परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करत परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.

डॉ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता

हेही वाचा - 'कोरोना'चा कहर : यवतमाळमध्ये आणखी एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधितांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे. प्रथम वर्षाच्या इंटरनल असेसमेंटची परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा 3 ते 4 दिवस चालणार होती. मात्र, विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे असल्याने अनेक पालकांनी मुलांशी संपर्क साधून त्यांना घरी परत येण्यास सांगितले आहे. त्यामुळे या 200 विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

तर कोरोना विषाणूच्या भीतीने अनेक विद्यार्थ्‍यांनी परीक्षेला दांडी मारली आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसल्याचे सांगितले आहे. तसेच ही परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार आम्हाला नाही. आम्ही तशी माहिती वैद्यकीय संचालकांकडे पाठवली आहे, असे कांबळे यांनी सांगितले.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट; रात्री आठ वाजेपर्यंतच बार, रेस्टॉरंट राहणार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.