यवतमाळ : महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेच्या (Strike Of State Association Resident Doctors) वतीने विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत मागण्यांची पुर्तता करण्यात आलेली नाही. प्रलंबित मागण्यांचे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्या, समस्यांसंदर्भात राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण मंत्री, संबंधित विभागाचे सचिव, आयुक्त व संचालक यांच्यासोबत बैठका घेण्यात आल्या, मात्र मागण्यांवर कुठलाही तोडगा निघालेला नाही. MARD Doctors Strike
याअंतर्गत यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Yavatmal Government Hospital) कार्यरत निवासी डॉक्टरांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर संघटना मार्ड (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) च्या नेतृत्वात आज सोमवारपासून संप सुरू केला आहे. यात यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील दिडशे निवासी डॉक्टरांचाही (150 Resident Doctors on Strike) समावेश आहे. त्यामुळे रुग्णसेवा कोलमडण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील सर्व शासकीय, पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होते. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांच्या पदनिर्मितीचा प्रश्न रखडलेला आहे. सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. 16 ऑक्टोबर 2018 प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तत्काळ देण्यात यावा, महाराष्ट्रातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून समान वेतन लागू करावे, आदी मागण्या निवासी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील साधारण सात हजार निवासी डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती आहे. संपामुळे रुग्णालयांमध्ये या सेवा विस्कळीत होणार आहेत. फक्त BMC सेंट्रल MARD च्या बिगर आपत्कालीन / OPD (पर्यायी) सेवा मागे घेण्यात येणार आहेत. निवासी डॉक्टर सर्व आपत्कालीन सेवांमध्ये त्यांची सेवा सुरू ठेवतील. सकाळी 8 वाजल्यापासून फक्त निवडक कामे (वॉर्ड आणि ओपीडी) बंद राहतील. आपत्कालीन भागात डॉक्टर त्यांची सेवा सुरू ठेवतील, अशी माहिती मिळाली आहे. MARD Doctors Strike