ETV Bharat / state

यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात गॅस्ट्रोची साथ, १२ जणांवर उपचार सुरू

मारेगाव शहरासह तालुक्यातील काही गावात गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्ण मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत.

यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात गॅस्ट्रोची साथ, १२ जणांवर उपचार सुरू
author img

By

Published : Jun 3, 2019, 5:40 PM IST

यवतमाळ - मारेगाव शहरासह तालुक्यातील काही गावात गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्ण मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, गॅस्ट्रो झालेल्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना गॅस्ट्रोची लागण कशामुळे झाली याचे कारण अद्याप समोर आले नाही.

मारेगाव तालुक्यातील काही गावात गॅस्ट्रोची लागण झाल्याने रुग्णांना हगवण, उलटी आणि मळमळ होत असल्याची लक्षणे दिसताच गावावातील नागरिक तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. या ठिकाणी मागील 4 ते 5 दिवसांपासून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील अनिल व्हराटे, सिंधू श्रावण किन्हेकर, साधना राऊत, मेघा नगराळे, मंगला वरटकर, रजिया शेख गुलाब, सुशीला आत्राम, प्रमिला आत्राम, रेखा आत्राम (भालेवाडी), मंदा डवरे (गोदनी), इंदिरा लोहकरे (टाकरखेडा), विनोद आत्राम (भालेवाडी) यासह ईतर रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

यापूर्वीही मारेगाव शहरात प्रभाग क्रमांक 3 व 4 मध्ये दूषित पाण्यामुळे 12 रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. दरम्यान, या प्रभागतातील पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी नेले होते. मात्र, तपासलेले पाणी दूषित आहे, याची नागरिकांना कल्पना नसल्याने पाणी पिणे अजूनही सुरु आहे. त्यामुळे या प्रभागातील काही जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.

तालुका आरोग्य विभागाच्यावतीने मारेगाव नगरपंचायतीसह ज्या गावात गॅस्ट्रोची लागण झाली आहे, अशा गावातील पाण्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले आहेत.

Intro:मारेगाव तालुक्यात गॅस्ट्रोची लागण 
अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयात भर्ती Body:यवतमाळ : मारेगाव शहरासह तालुक्यातील काही गावात गॅस्ट्रोची लागण झाली असून अनेक रुग्ण मारेगाव ग्रामीण रुग्णालयात भर्ती झाले आहे. भरती रुग्णावर उपचार सुरु असून गॅस्ट्रोची लागण कश्यामुळे जाळू याचे मात्र अजूनही निदान लागले नाही.
मारेगाव तालुक्यातील काही गावात गॅस्ट्रोची लागण झाल्याने हगवण व उलटी जीव मळमळ होत असल्याची लक्षणें मोठ्या प्रमाणात समोर येताच त्या गावातील अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालय दाखल झाले. मागील चार पाच दिवसापासून रुग्णावर उपचार सुरु आहे. यात शहरातील अनिल व्हराटे, सिंधू श्रावण किन्हेकर, साधना राऊत, मेघा नगराळे, मंगला वरटकर, रजिया शेख गुलाब, सुशीला आत्राम, प्रमिला आत्राम, रेखा आत्राम (भालेवाडी), मंदा डवरे (गोदनी), इंदिरा लोहकरे (टाकरखेडा), विनोद आत्राम (भालेवाडी) यासह ईतर रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे .
या पूर्वीही मारेगाव शहरात प्रभाग क्रमांक तीन व चार येथे दूषित पाण्यामुळे बारा रुग्णांना गॅस्ट्रोची लागणं झाली होती. दरम्यान त्या प्रभागतातील पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासणी साठी नेले होते. परंतु ते तपासलेले पाणी दूषित आहे का याची नागरिकांना कल्पना नसल्याने पाणी पिणे सुरु असून त्या प्रभागातील पुन्हा काही गॅस्ट्रो मुळे उपचारासाठी भर्ती झाले आहे.
तालुका आरोग्य विभागाच्या वतीने मारेगाव नगरपंचायतसह ज्या गावात गॅस्ट्रोची लागण झाली आहे, अश्या गावातील पाण्याचे नमुने गोळा करून पाठविले. तिथे फुटलेल्या पाईप लाईन दुरुस्त करण्या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती
तालुका आरोग्य अधिकारी अर्चना देठे यांनी दिली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.