ETV Bharat / state

यवतमाळ-वाशिम लोकसभा : युतीच्या भावना गवळी विजय, तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा पराभव - Bhavana Gawali

शिवसेनेच्या भावना गवळी यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.

माणिकराव ठाकरे, वैशाली येडे आणि खासदार भावना गवळी
author img

By

Published : May 23, 2019, 6:01 AM IST

Updated : May 23, 2019, 7:48 PM IST

यवतमाळ - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे प्रश्न कोण संसदेत मांडणार? हे थोड्याचवेळात स्पष्ट होणार आहे. यासाठी शहरातील दारवा मार्गावरील सरकारी ग्रेड गोडाऊनमध्ये थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. यावेळी शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी रिंगणात होत्या, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी निवडणूक लढवली. शिवाय या दोघांही राजकीय धुरंदरांपुढे प्रहार संघटनेच्या वैशाली येडे यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. आता या तिहेरी लढतीत यवतमाळ-वाशिमचे मतदार विजयाचा कौल कोणाला देणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

LIVE UPDATES -

  • सा.७.30 -भावना गवळी यांचा विजय झाला आहे, त्यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.
  • सा. ६.00- भावना गवळी ७८ हजार २२२ मतांनी आघाडीवर
  • दु. ३.१७ - भावना गवळी ४६ हजार ३४९ मतांनी आघाडीवर
  • दु. २.५१ वा. - भावना गवळी ४४ हजार ६५४ मतांनी आघाडीवर
  • दु. १.३७ वा. - सहाव्या फेरीच्या अखेरीस भावना गवळी १३ हजार २६२ मतांनी आघाडीवर
  • दु. १.२६ वा. - भावना गवळी २७ हजार मतांनी आघाडीवर
  • दु. १२.५१ वा. - मतदार वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून खासदारकी देणार आहेत - भावना गवळी
  • दु. - १२.०७ वा. - भावना गवळी १० हजार मतांनी आघाडीवर
  • स. ११.५६ वा. - भावना गवळी ३८०० मतांनी आघाडीवर
  • स. १०.५५ - भावना गवळी ७२ हजार ७७१ मतांनी आघाडीवर
  • स. १०. ०० वा - युतीच्या भावना गवळी यांना १७ हजार ७७८, तर काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना १४ हजार ७४७ मतं पडलेली आहे.
  • स. ९.४० वा - युतीच्या भावना गवळी ४ हजार मतांनी आघाडीवर
  • स. ९.१२ वा. - महायुतीच्या उमेदवार खासदार भावना गवळी आघाडीवर
    स. ९.१० वा. - माणिकाराव ठाकरे मतदान केंद्रावर हजर. या निवडणुकीत मीच निवडून येणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.
  • स. ८ वा - मतमोजणीला सुरुवात
  • स. ७.४५ वा. - काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन देवाकडे विजयासाठी साकडे घातले. तसेच विजय होणार असल्याचे सांगितले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान -

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात गेल्या ११ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी ११ लाख ६९ हजार ८०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात एकूण ६१.०९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीपेक्षा यंदा तब्बल अडीच टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारीचा कुणाला फायदा होणार? हे आज स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीत सलग ४ वेळा खासदार असणाऱ्या शिवसेनच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये थेट सामना रंगला होता. या दोन्ही उमेदवारांसमोर पक्षांतील अंतर्गत गटबाजी संपवण्याचे मोठे आव्हान होते. या मतदारसंघात भाजप ४, राष्ट्रवादी १ आणि शिवसेनेकडे १ असे विधानसभा मतदारसंघाचे प्राबल्य आहे. त्यामुळे याचा फटका माणिकराव ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे.

असे असले तरी युतीच्या उमेदवार भावना गवळी यांना ही निवडणूक कठीण गेल्याचे चित्र आहे. शिवाय, सेनेत अंतर्गत गटबाजी असून ती दूर करणेही खूप मोठे आव्हान होते. शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, सिंचनाचा प्रश्न या कळीच्या मुद्दयांवर ही निवडणूक लढवली गेली. त्यातच प्रहारच्या उमेदवार वैशाली येडे या शेतकरी विधवा असल्याने त्यांनी काँग्रेस आणि सेना या दोन्ही उमेदवारांच्या मतांच्या आकडेमोडीवर प्रहार केल्याचे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले.

२०१४ ची राजकीय परिस्थिती -
२०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारास यवतमाळ, दिग्रस, राळेगाव आणि कारंजा ४ विधानसभा मतदारसंघातून चांगली बढत मिळाली होती. तर काँग्रेसच्या उमेदवाराला वाशिम आणि पुसद या २ विधानसभा मतदारसंघात बढत मिळाली होती. खासदार गवळी यांनी ९३ हजार मतांनी शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला होता.
या लोकसभा निवडणुकीत खासदार भावना गवळी यांच्यावर मतदारांची मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. शिवसेनेतील गटबाजी तसेच बंजारा आणि पाटील समाजाचे उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजनाचा झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे भावना गवळी आपला गढ राखणार? की माणिकराव ठाकरे वरचढ ठरणार? की शेतकरी मतदारवर्ग वैशाली येडेंना पाठिंबा देणार? याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Intro:Body:

DUmmy

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.