ETV Bharat / state

देशी दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; एलसीबीची कारवाई - Two person arrest by lcb

अवैधपणे देशी दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना एलसीबी (लोकल क्राईम ब्रांच )च्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी एलसीबीने संपूर्ण देशी दारू, दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 34 हजार 200 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

Two people arrested for illegal liquor transport
अवैध दारु वाहतूक प्रकरणी दोघांना अटक
author img

By

Published : Jul 4, 2020, 8:31 AM IST

यवतमाळ - अवैधरित्या देशी दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना एलसीबी (लोकल क्राईम ब्रांच )च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याजवळून 1 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वणी येथील शासकीय रुग्णालय मार्गावर करण्यात आली. विशाल लोनारे (33) मुकेश लोहकरे (28) दोघेही रा. अशोक सम्राट नगर, वणी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

वणी शहरातील दानव यांच्या देशी दारूच्या दुकानातून विशाल लोनारे हा तरूण देशी दारूच्या पेट्या घेवून जाणार होता. याबाबतची माहिती एलसीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांना मिळाली. त्यावरुन एलसीबीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास वणीतील शासकीय रुग्णालय परिसरात सापळा रचला. यावेळी एलसीबी पथकाने विना नंबरची दुचाकी थांबवून दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्याजवळ देशी दारुच्या तब्बल 200 बॉटल आढळून आल्या.

दरम्यान, विशाल लोनारेची कसून चौकशी केली असता तो दारुसाठा त्याच्या घरी साठवून विक्री करत असल्याचे समोर आले. त्यावरुन लोनारेच्या घराची झडती एलसीबीकडून घेण्यात आली. यावेळी विशाल लोनारे याच्या घराच्या आवारातील बाथरुममध्ये देशी दारुच्या एक हजार बॉटल आढळून आल्या. या प्रकरणी एलसीबी पथकाने संपूर्ण देशी दारू, दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 34 हजार 200 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पथकातील गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, निखील मडसे यांनी पार पाडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.