यवतमाळ - आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघातील कापसी या गावाला 40 वर्षीपासून ग्रामपंचायत नसल्यामुळे विकास खुंटला आहे. अद्यापही कापसीला ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला नाही. 415 लोकसंख्या असलेले कापसी गाव विकासापासून कोसो दुर आहे. गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतची मागणी केली आहे.
प्रशासनाकडे पाठविला ठराव
1981 पासून म्हणजेच 40 वर्षीपासून कापसी गावाला ग्रामपंचायत नसल्याने गावाचा विकास खोळंबला आहे. गावाला ग्रामपंचायत मिळण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी वारंवार पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना ठराव दिले आहे. परंतु त्यामध्ये येत असलेल्या शासकीय त्रृट्या दुर करता ग्रामस्थ डबघाईस आले आहे. मात्र तरी सुद्धा ग्रामपंचायत मिळाली नाही. कापसी गावाला ग्रामपंचायत नसल्याने स्थानिक गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न अशा अनेक समस्या आहेत. या समस्या दुर करण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि कापसी गावाच्या ग्रामपंचायतीचा प्रश्न निकाली काढावा, असी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. स्थानिक आमदार संजय राठोड यांनी कापसीतील निर्माण झालेल्या समस्या दुर करण्यासाठी व कापसीला ग्रामपंचायत मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. त्यामुळे कापसी येथील गावकऱ्यांनी त्यांच्या प्रति नाराजी व्यक्त केली आहे.