ETV Bharat / state

Kalamb famous for Chintamani Ganpati यवतमाळ जिल्ह्यातील कळंब हे चिंतामणी गणपतीसाठी प्रसिद्ध, जाणून घ्या सविस्तर... - चिंतामणी गणपती

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात कळंब हे चिंतामणी गणपतीसाठी प्रसिध्द Kalamb famous for Chintamani Ganpati आहे. हिंदू धर्म ग्रंथानुसार येथील वृक्षाखाली इंद्रदेवाने श्री गणेशाची स्थापना केली. Kalamb in Yavatmal district is famous for Chintamani Ganpati

Chintamani Ganpati
चिंतामणी गणपती
author img

By

Published : Sep 4, 2022, 2:29 PM IST

यवतमाळ महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात कळंब हे चिंतामणी गणपतीसाठी प्रसिध्द Chintamani Ganpati in Kalamb आहे. हिंदू धर्म ग्रंथानुसार येथील वृक्षाखाली इंद्रदेवाने श्री गणेशाची स्थापना केली. कळंब हे यवतमाळ- नागपूर रस्त्यावर वसलेले एक प्राचीन गाव Yavatmal district is famous for Chintamani Ganpati आहे. येथे चिंतामणी गणेशाचे भूमिगत मंदिर आहे. गणेश कुंड म्हणून प्रसिद्ध पाण्याची टाकी आहे. गाव चक्रवर्ती नदीच्या तीरावर वसलेले आहे. श्री चिंतामणीची जत्रा माघ शुद्ध चतुर्थी पासून सप्तमीपर्यंत भरते. येथे दर बारा वर्षांनी मंदिराचा परिसर जलमय होतो. परंतु श्री गणेशाच्या स्पर्शाने पाणी ओसरते, अशी श्रध्दा आहे. येथे पावन नावाचे पाण्याचे कुंडही आहे.

मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली अख्यायिका विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपातळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून पायèया उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले, तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.

लोककथा story behind Chintamani Ganpati ब्रह्मदेवाने एक लावण्यवती स्त्री निर्माण केली, तिला आपली मुलगी मानले. त्याने या मुलीचे नाव अहिल्या ठेवले. अहिल्येच्या लावण्याने देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग वगैरे सगळेच मोहित झाले होते. अहिल्येचा विवाह करावा, असे जेव्हा ब्रह्मदेवास वाटले तेव्हा त्याने एक पण जाहीर केला. त्यानुसार जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल, त्यालाच अहिल्येशी विवाह करता येणार होता. पण ऐकून सारेच पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. हा पण आर्यवर्तातल्या महषी गौतम यांच्या कानावरही आला. त्यांनी प्रसूत होणाऱ्या आश्रमातील गायीस प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाकडे शास्त्राप्रमाणे अहिल्येची मागणी केली. ब्रह्मदेवाने शास्त्राधार मान्य करून महर्षी गौतम यांना आपली कन्या प्रदान केली. पृथ्वी प्रदक्षिणेसाठी गेलेल्या मंडळीतील देवराज इंद्र सर्वप्रथम परत आल्यावर त्याला अहिल्येच्या विवाहाची बातमी कळली. पण विवाह झाला असल्याने काही उपाय नव्हता. अहिल्येच्या लावण्याने इंद्र घायाळ झाला होता. महर्षी गौतम आपल्या आश्रमात नाहीत, असे पाहून इंद्राने गौतमाचा वेष धारण करून अहिल्येशी दुराचार केला. महर्षी गौतम यांना हे कळताच त्यांनी इंद्राला महारोगी होण्याचा शाप दिला.

दर १२ वर्षांनी कळंबच्या मंदिरातील कुंडातून गंगा वर येते इंद्राने महर्षी गौतम यांची क्षमा मागितल्यावर गौतम अत्रींनी गणेश षडाक्षर मंत्राचा उपदेश इंद्रास केला. विदर्भात करंब (कळंब) येथे जाऊन श्री चिंतामणीची तपश्चर्या करण्यास सांगितले. इंद्राच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या अंकुशाने एक कुंड निर्माण केले. या कुंडातील पाण्याने स्नान करून इंद्राचा रोग नाहीसा झाला. तेव्हापासून या पाण्याने पापक्षालन होते असे मानतात. स्नान झाल्यावर इंद्राने तेथेच गणेशाची स्थापना केली. गणेश अभिषेकासाठी स्वर्गातून गंगेला पाचारण केले. तिला आदेश दिला की, दर १२ वर्षांनी तिने पृथ्वीवर येऊन श्री गणेशाच्या पायाला स्पर्श करून जावे. तेव्हापासून दर १२ वर्षांनी कळंबच्या मंदिरातील कुंडातून गंगा वर येते, आणि देवाच्या चरणांना स्पर्श करून निघून जाते. हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरात लाखो लोक जमतात. गेल्या शतकात सन १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३ आणि १९९५ या वर्षी मंदिरातील कुंडातून गंगा अवतरली आहे.

गणेशाची जगातील एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती गणेश समोरच मुख्य गाभाऱ्यात देवेंद्र वरद श्री चिंतामणीची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. ही श्री गणेशाची जगातील एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती असल्याचे मानले जाते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या सभामंडपाची निर्मिती बालगंधर्व यांनी केली आहे. यवतमाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमाची संपूर्ण मिळकत त्यांनी या कामी खर्च केली. Kalamb in Yavatmal district is famous for Chintamani Ganpati

हेही वाचा Ganeshotsav 2022 पुण्यात देखाव्यातून मेट्रो कॉरिडॉर 2 ची साकारली प्रतिकृती, पुण्यातील सम्राट रावते यांची कल्पक्ता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.