ETV Bharat / state

CORONA : कळंबचे चिंतामणी मंदिर दर्शनासाठी बंद, गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

author img

By

Published : Mar 17, 2020, 4:58 PM IST

कळंब येथील चिंतामणीच्या दर्शनासाठी विदर्भातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची चिंतामणीवर श्रद्धा आहे. कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. जितकी गर्दी कमी करता येईल, यासाठी शासनाचा प्रयत्न करत आहे.

yavatmal
CORONA : कळंबचे चिंतामणी मंदिर दर्शनासाठी बंद, गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचे तीन संशयित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कळंब येथील चिंतामणी मंदिर आजपासून (मंगळवार) दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा - Coronavirus : एमबीबीएसच्या 200 विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार, 31 मार्चनंतर परीक्षा घेण्याची मागणी

कळंब येथील चिंतामणीच्या दर्शनासाठी विदर्भातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची चिंतामणीवर श्रद्धा आहे. कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. जितकी गर्दी कमी करता येईल, यासाठी शासनाचा प्रयत्न करत आहे. जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालय, मॉल, सिनेमागृह अशी गर्दीची ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच धर्तीवर तहसीलदारांनी गर्दी टाळण्यासाठी देवस्थान कमिटीला मंदिर काही दिवस बंद ठेवण्याची विनंती केली. त्यावरून चिंतामणी मंदिर काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील प्रसादालयही कोरोनामुळे बंद ठेवण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.