ETV Bharat / state

...म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहायक प्राध्यापकांनी पुकारला बेमुदत संप - यवतमाळ जिल्हा बातमी

विविध मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राधपकांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे वैद्यकीय सुविधेवर मोठा परिणाम झाला आहे.

agitator
आंदोलक सहायक प्राध्यापक
author img

By

Published : Nov 2, 2020, 6:33 PM IST

यवतमाळ - सरकारी सेवेत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, सातवा वेतन आयोग लागू करावा, कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना आरोग्य सुरक्षा कवच द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहायक प्राध्यापकांनी आजपासून (दि. 2 नोव्हेंबर) बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे वैद्यकीय यंत्रणा कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.

आपल्या व्यथा मांडताना आंदोलनकर्ते

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातील 34 अस्थायी सहायक प्राधापकांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या संपामुळे वेळवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहे. मात्र, लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरुच राहणार, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. राज्यातील 19 शासकीय महाविद्यालयात 480 अस्थायी सहायक प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे आजपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे याचा परिणाम महाविद्यालयातील रुग्णसेवेवर पडणार आहेत. यावेळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करण्यात आली.

  • या आहेत प्रमुख मागण्या
  1. सरकारी सेवेत सामावून घेणे
  2. सातवा वेतन आयोग लागू करावा
  3. सर्व शासकीय लाभ मिळावेत
  4. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा मिळावी

हेही वाचा - यवतमाळात खासदार बाळू धानोरकर यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.