यवतमाळ : ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत ( Har Ghar Tiranga Abhiyan in Yavatmal ) प्रत्येक घरावर झेंडा फडकविण्यासाठी ( Hoisting of the tricolor on the house ) नागरिकांना सहज राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावे यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने पुढाकार ( Initiative by Yavatmal District Administration for Tiranga Abhiyan ) घेतला आहे. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन ( Inauguration of National Flag Sales Center in Yavatmal ) आज करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या उपस्थितीत ध्वज विक्रीचा शुभारंभही ( Inauguration of National Flag Sales Center ) करण्यात आला.

या अधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार - याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी सविता चौधरी, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, मुख्याधिकारी माधुरी मडावी, तहसिलदार कुणाल झाल्टे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे, प्राचार्य प्रशांत गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचे आवाहन - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरावर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे सध्या एकूण चार लाख झेंडे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राष्ट्रध्वज विक्रीसाठी सर्व पंचायत समिती व सर्व नगरपालिका यांचेकडे वितरित करण्यात येत आहेत. नागरिकांना वरील विक्री केंद्रावर 23 रुपयात राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावून 'हर घर तिरंगा अभियानात' सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
.
