ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात ४८ नवे कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू - corona deaths yavatmal

प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एका कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून, ४८ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मृतांमध्ये यवतमाळ शहरातील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत ५३६ अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ९ हजार १४८ इतकी आहे.

कोविड यवतमाळ
कोविड यवतमाळ
author img

By

Published : Oct 14, 2020, 12:15 PM IST

यवतमाळ - मागील आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत चालली आहे. मृत्यूचे प्रमाण घटले आहे. तर, दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड, तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

काल मिळालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एका कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून, ४८ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मृतांमध्ये यवतमाळ शहरातील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत ५३६ अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ९ हजार १४८ इतकी आहे.

काल (१३ ऑक्टोबर) ५९ जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार २३३ इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९० मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत ८१ हजार ७२० नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून यापैकी ८० हजार ७७८ प्राप्त, तर ९४२ अप्राप्त अहवाल आहेत. तसेच, ७१ हजार ६३० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.

हेही वाचा-'मदिरालये सुरू, मंदिरे बंद, उद्धवा अजब तुझे सरकार', भाजपचे मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी उपोषण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.