यवतमाळ - शहरातील जाजू चौकात अवधुतवाडी पोलिसांनी एका चारचाकी वाहनातून 23 पेट्या देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करून तब्बल 2 लाख 57 हजार 408 रूपयांचा मुदे्माल पोलिसांनी जप्त केला आहे. अर्जुन राजेंद्र तिहीले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे धाड
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार जाजू चौक येथे एक व्यक्ती चारचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक करत असल्याची खबर मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी जाजू चौकात सापळा रचला. यावेळी एक इंडिका गाडी (एम.एच.29 आर. 1198) संशयीतरित्या जाताना पोलिसांना दिसली. तेव्हा पोलिसांनी वाहनचालकाची थांबवून चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उतरे दिली. यानंतर गाडीची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात दारुचा साठा आढळून आला.
अवधूत वाडी पोलिसांची कारवाई
वाहनाच्या डिक्कीत व आतील सीटवर 23 दारूच्या पेट्या अंदाजे 57 हजार 408 रुपये व जुनी इंडिका कंपनीची कार अंदाजे किंमत दोन लाख. असा एकूण दोन लाख 57 हजार 408 रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करताना आढळला. त्यानुसार संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई अवधुतवाडी पोलीसांनी केली आहे.
यवतमाळमध्ये अडीच लाखांचा अवैध दारूसाठा जप्त - अवधुतवाडी पोलिस
पोलिसांनी जाजू चौकात सापळा रचल्यानंतर इंडिका गाडी (एम.एच.29 आर. 1198) संशयितरित्या जाताना दिसली. तेव्हा पोलिसांनी वाहनचालकाची थांबवून चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उतरे दिली. तसेच गाडीची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात दारुचा साठा आढळून आला.