ETV Bharat / state

अवैध गुटखा विकणाऱ्यांवर कारवाई; ग्रामसुरक्षा दलाचे सहकार्य

लॉकडाऊनचा गैरफायदा घेत अवैध गुटखा तस्करी करताना 20 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. उमरखेड पोलिसांनी रात्रीच्या वेळी संबंधित कारवाई केली आहे.

yavatmal illegal tobacco smuggling
लॉकडाऊनचा गैरफायदा घेत अवैध गुटखा तस्करी करताना 20 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
author img

By

Published : Apr 17, 2020, 7:51 PM IST

Updated : Apr 17, 2020, 9:06 PM IST

यवतमाळ - लॉकडाऊनचा गैरफायदा घेत अवैध गुटखा तस्करी करताना 20 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. उमरखेड पोलिसांनी रात्रीच्या वेळी संबंधित कारवाई केली आहे. गुटख्याचा काळाबाजार करून हे व्यावसायिक आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. मात्र, उमरखेड तालुक्यातील लिम्बगव्हाण येथे ग्रामसुरक्षा दलाने अशा व्यावसायिकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलंय रात्रीच्या गस्तीदरम्यान गुटख्याने भरलेली चारचाकी पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी सय्यद जावेद या वाहनचालकाला अटक केली आहे. तसेच चारचाकीसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उमरखेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

लॉकडाऊनचा गैरफायदा घेत अवैध गुटखा तस्करी करताना 20 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

सद्या लॉकडाऊनमुळे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. यामुळे व्यसने करणाऱ्यांच्या अडचणीत भर पडलीय. ठिकठिकाणी तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू अवैधरित्या विकण्यात येत आहे. यामुळे पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांवर कारवाई केल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Last Updated : Apr 17, 2020, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.