यवतमाळ : टायर, अॅल्युमिनिअम, मेटल आदी साहित्याआड करण्यात येत असलेल्या सुगंधित तंबाखू तस्करीचा ( tobacco smuggling ) पर्दाफाश करण्यात आला. शनिवारी रात्री दरम्यान पिंपळखुटी चेकपोस्टवर करण्यात आलेल्या कारवाईत ट्रक व तंबाखू असा एकूण 46 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त ( worth 46 lakh seized ) करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलिसांनी ही कारवाई केली.
अशी केली कारवाई - नागपूरमार्गे आदिलाबडे एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्ट येथे सापळा रचला. संशयित ट्रक दिसताच सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, टायर, अॅल्युमिनिअम, मेटल, कार्टुन आदी साहित्य होते. तर, आतमध्ये असलेलया नॉयलॉन थैलीत सुंगंधित तंबाखू आढळला. चालक फकरू रती खान (वय 31, रा. हमजापूर, हरियाणा) याच्याकडे तंबाखू वाहतुकीचे कागदपत्रे आढळले नाहीत. ट्रक जप्त करून पोलिस ठाण्यात आणला. अन्न सुरक्षा अधिकार्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
46 लाखांचा मुद्देमाल जप्त - 20 लाख रुपये किमतीचा तंबाखू व ट्रक असा एकूण 46 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक विजय महाले, सपोनि हेमराज कोळी, अशोक नैताम, राजू बेलयवार, सचिन काकडे, राजेश सुरोश आदींनी केली.