यवतमाळ - माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या विरोधात स्पीडपोस्टने घाटंजी पोलीस ठाणे व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी एसआयटी कमिटी स्थापन केली होती. या कमिटीने चौकशी केली होती. ज्या महिलेच्या नावाने ती तक्रार होती त्या महिलेने मी अशी कुठलीच तक्रार आमदार संजय राठोड विरोधात केली नसल्याचे, जबाब नोंदवला आहे. ही झालेली तक्रार कोणाचातरी खोडसाळपण असावा अशी शक्यताही या महिलेने आपल्या व्यक्त केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे या शरीरसुखाच्या मागणीसाठी केलेल्या तक्रारीतून आता संजय राठोड यांना क्लीन चिट मिळाली आहे.
'चित्रा वाघ यांनी केले होते ट्विट'
घाटंजी तालुक्यातील एका महिलेने माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची गंभीर स्वरूपाची तक्रार केली होती. यासंदर्भात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करीत समाज माध्यमावर ही पोस्ट टाकली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तातडीने एसआयटी समिती स्थापन केली होती. अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या समितीने तक्रारीत नाव असलेल्या महिलेचे 14 ऑगस्ट रोजी इनकॅमेरा घाटंजी पोलीस ठाण्यामध्ये बयान नोंदविले होते. यावेळी या महिलेचे पती, तिचे वडील, यांचा ही जबाब विशेष चौकशी समितीने घेतला होता.
'19 ऑगस्टला घेतला आमदार राठोड यांचा जबाब'
चौकशी समितीने 19 ऑगस्ट रोजी आमदार राठोड यांचा जबाब नोंदवला होता. यात त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून हे आरोप बिनबुडाचे आहे. यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचा जबाब त्यांनी नोंदवला असल्याचे पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
'तक्रार अर्ज आशी तिळमात्र संबंध नाही'
जी तक्रार दाखल झाली होती यात या घटनेत माझा याशी कुठलाही संबंध नसल्याचे, चौकशी समितीला त्या महिलेने सांगितले. तसेच, त्या तक्रार अर्जात पतीचे नाव चुकीचे असून स्वाक्षरीही माजी नसल्याचे सांगितले. कुणीतरी खोडसाळपणा करून माझ्या नावाचा वापर केल्याचेही आपल्या जबाबात त्या महिलेने सांगितले आहे.
'चौकशी समितीने केला अहवाल सादर'
स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी समितीने दाखल झालेल्या दोन्ही तक्रारी अर्जावर घाटंजी येथील पोस्टाचे अधिकारी कर्मचारी यांचाही जबाब नोंदवला. यामध्ये 10 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून 19 मिनिटांनी हे दोन्ही तक्रार अर्जाची लिफाफे पंजीकृत झाल्याचे अहवालात म्हटले. दोन अनोळखी व्यक्तीने हे लिफाफे आणल्याची माहिती पोस्टातील कर्मचाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. एकंदरीतच महिलेचा जबाबमध्ये ही तक्रार माजी नसल्याचे स्पष्ट केल्याने, आमदार संजय राठोड यांना या शरीरसुखाच्या मागणी केल्याच्या आरोपातून क्लिनचिट मिळाली आहे.