ETV Bharat / state

यवतमाळमध्ये नोकराच्या प्रामाणिकपणामुळे गरिबाला मिळाली 8 हजाराची रक्कम परत - HONEST WORKER

गजानन अजाबराव सरोदे असे त्यांचे नाव आहे.

हरवलेले पैसे प्रामाणिक नोकराने केले परत
author img

By

Published : Jun 21, 2019, 9:47 AM IST

यवतमाळ - चोरी, लबाडी करून पैसे उकळणाऱ्यांची आपण अनेक उदाहरणे पाहतो. पंरतु, सगळे काही सारखेच नसतात. असेच एक उदाहरण यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाले. एका नोकराने त्याला सापडलेले ८ हजार रुपये गरीब कुटुंबाला परत करून आपल्या प्रामाणिकतेचा आदर्श धडा समाजासमोर ठेवला आहे. गजानन अजाबराव सरोदे असे त्यांचे नाव आहे.

हरवलेले पैसे प्रामाणिक नोकराने केले परत

पुसद येथील गांधी चौकामध्ये असलेल्या प्रसाद हार्डवेअर या दुकानांमध्ये काकडदाती येथील गजानन अजाबराव सरोदे हे नोकर म्हणून काम करतात. दुकानात आलेल्या ग्राहकापैकी कुणाचे तरी पैसे असलेली पिशवी त्यांना मिळाली. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये ८ हजार रुपयाची रक्कम व महत्त्वाचे कागदपत्र व काही पासपोर्ट फोटो मिळाले. ही बाब गजाननने आपले मित्र छत्रपती हॉटेलचे मालक गजानन मुदगुले यांना सांगून ही रक्कम परत करण्याची प्रामाणिकता व्यक्त केली. मिळालेली ही रक्कम गुंज येथील विष्णू आनंद राठोड व कुंतीबाई विष्णू राठोड या दाम्पत्यांची होती. ते पैसे हरवल्याच्या काळजीने शोधाशोध करत होते. त्यावेळी त्यांनी त्या दुकानात पैशाची पिशवी मिळाली का? अशी विचारणा केली. गजानन सरोदे यांनी स्वतःहून ते तुमचे हरवलेले पैसे सुरक्षित असून काळजी करण्याची गरज नाही, म्हणत त्या गरीब राठोड दाम्पत्याला ती रक्कम परत करण्यात आली.

गजानन सरोदे यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी दहा हजाराची गरज होती. त्यासाठी त्यांनी त्यांचे मित्र गजानन घुले व राजू कांबळे यांच्याकडे 10 हजार उसनवारीची मागणी मागील चार-पाच दिवसापूर्वी केली होती. पैशाची गरज असताना 8 हजाराची रक्कम त्यांना सापडली. परंतु तरीसुद्धा त्या रकमेबाबत लालसा मनामध्ये न येऊ देता ती रक्कम परत करण्यात आली. त्यामुळे त्यांचा प्रामाणिकपणा समाजासाठी आदर्श उदाहरण ठरले आहे.

Intro:नोकराच्या प्रामाणिकतेने गरिबाला मिळाले आठ हजाराची रक्कम परतBody:यवतमाळ : चोरी, लबाडी करून पैसे उकळणाऱ्याची संख्या बळावल्याचे आपण अनेक उदाहरणे आपण पाहतो. असे असतानाही एका नोकराने त्याला सापडलेले 8 हजार रुपये गरीब कुटुंबाला परत करून आपल्या प्रामाणिकतेचा आदर्श धडा समाजासमोर ठेवला आहे.
पुसद येथील गांधी चौकामध्ये असलेल्या प्रसाद हार्डवेअर या दुकानांमध्ये काकडदाती येथील गजानन अजाबराव सरोदे हे नोकर म्हणून काम करतात. दुकानात आलेल्या ग्राहकापैकी कुणाचे तरी पैसे असलेली पन्नी त्यांना मिळाली. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 8 हजार रुपयाची रक्कम व महत्त्वाचे कागदपत्र व काही पासपोर्ट फोटो मिळाले. ही बाब गजाननने आपले मित्र छत्रपती हॉटेलचे मालक गजानन मुदगुले यांना सांगून ही रक्कम परत करण्याची प्रामाणिकता व्यक्त केली. मिळालेली ही रक्कम गुंज येथील विष्णू आनंद राठोड व कुंतीबाई विष्णू राठोड या दाम्पंत्य यांची होती. ते पैसे हरवल्याच्या काळजीने इकडे तिकडे शोधाशोध सुरू असताना याही दुकानात त्यांनी पैशाची पंनी मिळाली का अशी विचारणा केली. गजानन सरोदे यांनी स्वतःहून ते तुमचे हरवलेले पैसे साबूत असून काळजी करण्याची गरज नाही म्हणताच त्या गरीब राठोड दाम्पत्य यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्यांना ती रक्कम परत करण्यात आली.
गजानन सरोदे यांचे मुलीचे शिक्षणासाठी दहा हजाराची गरज असल्याने त्यांनी त्यांचे मित्र गजानन घुले व राजू कांबळे यांच्याकडे 10 हजार उसनवारची मागणी मागील चार-पाच दिवसापूर्वी केली होती. पैशाची गरज असताना 8 हजाराची रक्कम त्यांना सापडली. परंतु तरीसुद्धा त्या रकमेबाबत लालसा मनामध्ये न येउ देता ती रक्कम परत करण्यात त्याचा प्रामाणिकपणा समाजासाठी आदर्श उदाहरण ठरले आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.