ETV Bharat / state

तडवी आत्महत्या प्रकरणी गृह विभागाचा हलगर्जीपणा; शिवाजीराव मोघेंसह वसंत पुरकेंचा आरोप - वसंत पुरके

तडवी यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांवर कारवाई करण्यास गृहविभागाने हलगर्जीपणा केला, असा आरोप माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी केला आहे.

तडवी आत्महत्या प्रकरणी गृह विभागाचा हलगर्जीपणा; शिवाजीराव मोघेंसह वसंत पुरकेंचा आरोप
author img

By

Published : May 29, 2019, 8:37 PM IST

यवतमाळ - रॅगिंगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांवर कारवाई करण्यास गृहविभागाने हलगर्जीपणा केला, असा आरोप माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी केला आहे.

डॉ. पायल तडवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे. मात्र, गृह विभागाने संबधित आरोपींना अटक करण्यासाठी तब्बल 7 दिवस लावले आहेत. ते उच्चवर्णीय असल्यानेच गृहविभाग त्यांना अटक करण्यात धजावत नव्हते. संबंधित महिला आरोपींना अटक करण्यात आली तरी त्यांना जामीन मिळण्यात येऊ नये, अशी मागणी शिवाजीराव मोघे यांनी केली आहे.

तडवी आत्महत्या प्रकरणी गृह विभागाचा हलगर्जीपणा; शिवाजीराव मोघेंसह वसंत पुरकेंचा आरोप

त्याबरोबरच न्यायालयात आरोपींविरुद्ध 302 चा खटला चालवण्यात यावा, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या संबंधित महिला डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करावे, डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांना हा खटला चालवण्यासाठी शासनाने आर्थिक मदत द्यावी, कुटुंबीयांनी सुचविलेला वकील हे प्रकरण न्यायालयात चालवण्यासाठी देण्यात यावा, या प्रकरणाचा निपटारा जलदगती न्यायालयात करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

पायल तडवी ही रॅगिंगची बळी ठरली असून यासंदर्भात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी या महाविद्यालयात न झाल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप वसंत पुरके यांनी केला आहे. त्यामुळे या महाविद्यालयाच्या अधिष्ठांतावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Intro:डॉ. पायल तडवी त्यांच्या गुन्हेगारास अटक करण्यास गृह विभागाचा हलगर्जीपणा- माजीमंत्री ऍड.शिवाजीराव मोघे, प्रा. पुरके यांचा आरोपBody:यवतमाळ: वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी हिनं आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपी डॉक्टरांवर कारवाई करण्यास गृहविभाग हलगर्जीपणा केल्याचा आरोप माजीमंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
डॉ. पायल तडवी तिने आत्महत्या केली नसून तिचा मर्डर झालेला आहे. मात्र गृह विभागाने तब्बल सात दिवस संबंधित आरोपींना अटक करण्यासाठी लावले आहे.कारण काय तर ते उच्चवर्णीय असल्यानेच गृहविभाग त्यांना अटक करण्यात धजावत नव्हते. संबंधित महिला आरोपींना अटक करण्यात आले तरी त्यांना जामीन मिळण्यात येऊ नये, न्यायालयात आरोपींविरुद्ध 302 चा खटला चालवण्यात यावा, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या संबंधित महिला डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे, डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांना हा खटला चालवण्यासाठी शासनाने आर्थिक मदत देण्यात यावी, कुटुंबीयांनी सुचविलेला वकील हे प्रकरण न्यायालयात चालवण्यासाठी देण्यात यावा, तसेच अशा प्रकारचे खटले न्यायालयात वर्षानूवर्ष चालवण्यात येत असल्याने या प्रकरणाचा निपटारा जलदगती न्यायालयात करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांनी डॉ. पायल तडवी ही रॅगिंगची बळी ठरली असून यासंदर्भात असलेला कायदाची अंमलबजावणी या महाविद्यालयात काटेकोरपणे न झाल्यामुळेच की घटना घडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी रॅगिंगची सारख्या कायद्याची अंमलबजावणी महाविद्यालयात न केल्याने ही घटना घडल्याने त्यांच्यावरही ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.