यवतमाळ - जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच दुपारच्या सुमारासही पाऊस पडला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची तारांबळ उडाली होती.
शहरात अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांचीही दाणादाण उडाली. शाळा सुटल्याने विद्यार्थी ओलेचिंब झाले होते. अवकाळी पाऊस अजूनही अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे सध्या शेतकरी चिंतेत असून बोचरी थंडीही वाढू लागली आहे. अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे लोबींला आलेला गहू पूर्णतः आडवा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.