यवतमाळ - जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला विविध कर्मचारी संघटनांसह इंडियन मेडिकल असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लवचिक भूमिका घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरोग्य संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले. कोरोना संकट काळात रुग्णाचे हाल होत आहेत. यासाठी आंदोलन मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आझाद मैदानात आरोग्य संघटनेकडून आंदोलन सुरू आहे. मात्र त्यात यश आले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी लवचिक भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आरोग्य अधिकारी व डॉक्टर कामबंद आंदोलनावर ठाम तसेच आज आयुक्त पीयूष सिंह यांनी यवतमाळ येथे मेग्मोचे राज्याध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड, तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे दिलीप झाडे यांच्याशी जवळपास एक तास चर्चा केली. मात्र यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या बदलीवर आरोग्य विभागाचे डॉक्टर ठाम आहेत.तर दुरीकडे जिल्ह्यातील विविध समाजसेवी संघटना यांनी शिस्तप्रिय जिल्हाधिकारी असल्याचे म्हणत त्यांना समर्थन दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फलक धरून त्यांच्या बदलीचे राजकारण करू नये, यासाठी नागरिक गोळा झाले होते. जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून आरोग्य विभागाचे आंदोलन सुरू आहे. ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर पूर्णपणे कोलमडले आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड मात्र, अद्यपही यापासून दूर आहेत.