यवतमाळ - पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी निगडीत पंचतत्वांचे संवर्धन करण्यासाठी संपूर्ण राज्यात 'माझी वसुंधरा' हे अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण करून उपस्थितांना पर्यावरण संवर्धनासाठी 'हरीत शपथ' दिली.
'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत पालकमंत्र्यांनी दिली हरित शपथ - 'माझी वसुंधरा' अभियान न्यूज
'माझी वसुंधरा' अभियान हे नगर परिषद आणि नगर पंचायतीच्यावतीने राबविण्यात येणार असून यवतमाळ जिल्ह्यात 10 नगर परिषदा व सहा नगर पंचायती आहेत. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक नगर परिषद, नगर पंचायतीमार्फत अभियानाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत पालकमंत्र्यांनी दिली हरित शपथ