ETV Bharat / state

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले पालकमंत्री भुमरे - संदिपान भुमरे

पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी अपघातातील जखमी पाहताच आपला ताफा थांबवला व अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून येत जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात रवाना केले.

पालकमंत्री आले अपघातग्रस्त मदतीला धावून
पालकमंत्री आले अपघातग्रस्त मदतीला धावून
author img

By

Published : Apr 30, 2021, 1:41 PM IST

Updated : Apr 30, 2021, 3:03 PM IST

यवतमाळ - पालकमंत्री संदिपान भुमरे हे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी चार तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यवतमाळ येते परत येत असताना पांढरकवडा रोडवर एक अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली. यातील प्रवासी रस्त्यालगत पडून असताना पालकमंत्र्यांच्या ताफा येथून जात होता. अपघातातील गंभीर जखमी पाहताच त्यांनी आपला ताफा थांबवला व अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून येत जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात रवाना केले.

पालकमंत्री भुमरे आले अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून

पालकमंत्री संदिपान भुमरे हे वणी, पांढरकवडा, मारेगाव, रालेगाव येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करून यवतमाळ येथे परत येत असतांना पांढरकवडा ते यवतमाळ रस्त्यामध्ये एका रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्या ठिकाणी एका रिक्षामध्ये दहा ते बारा व्यक्ती होते. त्यातील अनेक जखमी होते आणि त्यांना कोणी मदत देत नव्हते. तसेच त्यांच्यासाठी कोणी थांबत नसताना पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आपला ताफा त्या ठिकाणी थांबवला व जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात रवाना केले. याप्रसंगी आमदार डॉ. संदीप धुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हेही त्यांच्यासोबत होते.

Last Updated : Apr 30, 2021, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.