ETV Bharat / state

दिलासादायक ! जिल्ह्यात 41 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ नाही - कोरोना आकडेवारी यवतमाळ बातमी

आज प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 41 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या रुग्णांची संख्या 54 आहे. यात 41 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश असून 13 केसेस प्रिझमटिव्ह आहेत.

जिल्ह्यात 41 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्ह्यात 41 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
author img

By

Published : Jun 5, 2020, 9:39 PM IST

यवतमाळ - येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 41 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला शुक्रवारी 42 रिपोर्ट प्राप्त झाले. यातील 41 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर, एका रिपोर्टचे अचूक निदान न झाल्यामुळे त्याची तपासणी पुन्हा करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 41 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण भरती आहेत.

आज प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 32 नमुन्यांपैकी 31 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय संभाजी नगर येथील चार रिपोर्ट निगे‍टिव्ह तर महागाव, वडगाव, नेर, कळंब ग्रामीण, वणी आणि मारेगाव येथील प्रत्येकी एक असे एकूण 41 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका रिपोर्टचे अचूक निदान झाले नसल्याने त्याची परत तपासणी करण्यात येणार आहे.

सध्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या रुग्णांची संख्या 54 आहे. यात 41 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश असून 13 केसेस प्रिझमटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 154 झाला आहे. यापैकी 111 जण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत 2 हजार 245 नमुने तपासणीला पाठविले असून सर्वांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. तर, जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 91 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.