ETV Bharat / state

'महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांची दिशाभूल; मदतीची घोषणा निव्वळ फसवणूक' - अशोक उईके यांची टीका

हे शासन शेतकऱ्यांप्रति संवेदनशील नाही. जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून फक्त मोजक्याच शेतकर्‍यांना हेक्टरी 10 हजारांची मदत मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी करत माजी मंत्री उईके यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

mla Ashok Uike
आमदार डॉ. अशोक उईके
author img

By

Published : Nov 8, 2020, 5:02 PM IST

यवतमाळ - महाविकास आघाडी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची मदत जमा करणार, असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून शेतकऱ्यांची केवळ दिशाभूल करीत असल्याचा आरोप माजीमंत्री तथा आमदार डॉ. अशोक उईके यांनी केला आहे. हे शासन शेतकऱ्यांप्रति संवेदनशील नाही. जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून फक्त मोजक्याच शेतकर्‍यांना हेक्टरी 10 हजारांची मदत मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी करणार असून यासाठी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याचेही यावेळी बोलताना सांगितले.

शेतीपिकांचे झालेले नुकसान
शेतीपिकांचे झालेले नुकसान
महाविकास आघाडी शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील-जिल्ह्यात अवकाळी पाऊस, सोयाबीनवर खोड किडीनंतर आता कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भा मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे अशा स्थितीत महाविकास आघाडी हे शेतकऱ्यांना पती कुठलेही सहानुभूती दाखवत नाही. जिल्ह्यात नुकतेच महाविकास आघाडीचे मंत्री येऊन गेले. मात्र, कुठल्याही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन, कपाशी, अवकाळी पावसाच्या नुकसान परिस्थिती याची पाहणी सुद्धा केली नाही. त्यामुळे हे शासन शेतकऱ्यांना प्रति किती संवेदनशील आहेत हे दिसून येत आहे.
मदतीची घोषणा निव्वळ फसवणूक'
अधिवेशनात प्रश्न मांडणार-जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठोस मदतीची गरज आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पंचनामे करायला पाहिजे होते. मात्र ते सुद्धा करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे या संदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न मांडून शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी करण्यात येणार असल्याचेही उईके यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.