यवतमाळ - भंडारा येथील अतिदक्षता विभागात दहा बालकांचा रात्रीच्या सुमारास भयानक आग लागून मृत्यू झाला. या भंडारा येथील घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई निश्चितच करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यानी दिली.
मुख्यमंत्र्याकडून चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यात रुग्णालयात प्रशासनाचा बेजाबदारपणा असून ही घटना कशी घडली. कोणी हलगर्जीपणा केला याची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येणार आहे. घडलेली घटना अतिशय दुःखद आहे. कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. चौकशी करून सत्य शोधण्यात येणार आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई केली जाईल जाणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
हेही वाचा - भंडाऱ्याची घटना मन सुन्न करणारी - जलसंपदा मंत्री जयंत पाटील
हेही वाचा - भंडारा दुर्घटनेची सरकारकडून गंभीर दखल - पालकमंत्री विश्वजीत कदम