ETV Bharat / state

सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश, ३ लाख ८० हजारांची तंबाखू जप्त - सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश

प्रतिबंधित असलेली ३ लाख ८० हजार रुपये किंमतीची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. ही कारवाई शनिवारी आर्णी येथे करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पानटपर्‍या बंद असून, खर्राविक्रीला मनाई आहे.

seized  3 lakh 80 thousand worth of tobacco in yawatmal
सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश
author img

By

Published : May 3, 2020, 9:19 PM IST

यवतमाळ - आलिशान वाहनातून प्रतिबंधित असलेली ३ लाख ८० हजार रुपये किंमतीची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. ही कारवाई शनिवारी आर्णी येथे करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पानटपर्‍या बंद असून, खर्राविक्रीला मनाई आहे. तरीदेखील चोरट्या मार्गाने गुटखा, तंबाखू तस्करी सुरूच आहे.

सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश

आर्णी येथील सलीम शेख गफूर शेख याच्या मालकीच्या आलिशान वाहनातून सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून छापा टाकला असता, ३ लाख ८० हजार रुपये किंमतीची सुगंधित तंबाखू व वाहन असा एकूण ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून सलीम शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. जयपूरकर यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे, संदीप सूर्यवंशी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सचिन पवार आदींनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.