ETV Bharat / state

ऑनलाइन विक्री करत तीन एकरातील फळाबागेवर साधली आर्थिक उन्नती - progressive farmers news

मराठवाड्यात कीर्तनाचा कार्यक्रम करण्यासाठी गेलो असता तेथील फळबाग पहिली. आणि आपल्या शेतातही अशाच फळबाग शेती करण्याचा निर्धार केला असल्याचे सुनील राऊत या शेतकऱ्याने सांगितले.

palodi
palodi
author img

By

Published : Feb 4, 2021, 8:11 PM IST

Updated : Feb 4, 2021, 9:24 PM IST

यवतमाळ - घरी तीन एकर शेती. यात पारंपरिक पद्धतीने कापूस, सोयाबीन, तूर लागवड करत होतो. पण दरवर्षीच शेतीवर कुठले ना कुठले संकट यायचे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी उत्पादनात घट आल्याने नेहमीच तोटा सहन करावा लागत होता. अशातच मराठवाड्यात कीर्तनाचा कार्यक्रम करण्यासाठी गेलो असता तेथील फळबाग पहिली. आणि आपल्या शेतातही अशाच फळबाग शेती करण्याचा निर्धार केला. आज तीन एकरामध्ये 130 झाडे अंजिराची, 200 झाडे पेरूची, 105 झाडे ॲप्पल बोरची, केसर आंबा 500 झाडे, श्वेत चंदन 110 दहा झाडे आणि सुरू शंभर झाडांची लागवड केली. पहिल्याच वर्षी अंजीर आणि पेरू फळ पिकातून पावणे दोन लाखाचे उत्पादन घेतले असल्याचे सुनील राऊत या शेतकऱ्याने सांगितले.

palodi
palodi

सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री

कोरोनाच्या काळामध्ये पेरू आणि अंजीर या पीएकाची व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक, ट्विटर यांच्या माध्यमातून जाहिरात केली. व्यापारी व बाजारपेठेत त्याची विक्री न करता कुणाच्याही मध्यस्तीविना थेट ग्राहकांना घरपोच या फळांची विक्री करू लागलो. सुनील महाराज यांनी पिकलेल्या फळाला औरंगाबाद, चिखली, खामगाव, जळगाव, जाफराबाद, चाळीसगाव येथपर्यंत बसवर माल पाठवित आहे.

palodi
palodi

सर्व पिकांना ठिबक, जैविक खते

फळबाग म्हटले, की शेतकरी रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर करतात. मात्र, माझ्या या तीन एकरातील कुठल्याही पिकावर ती रासायनिक खते व कीटकनाशके यांची फवारणी करीत नसून शेतामध्येच शेणखत, गोमूत्र, गूळ आणि कृषी विज्ञान विद्यापीठातून आणलेल्या औषधीमधूनच जैविक खत तयार करून पिकांना देत आहे.

farmer

फळबागेत आंतरपीक लागवड

तीन एकर शेतामध्ये लागवड केलेल्या फळ बागेमध्ये दहा गुंठ्यात लसूण, एक एकरवर जवळपास कांदा आणि अर्धा गुंठ्यात बरबटी तसेच पालक, संभार (कोथिंबीर) अशा पालेभाज्या या पिकांची लागवड केल्याने यातूनही उत्पन्न निघत आहे.

संपूर्ण कुटुंब राबतेय शेतावर

कुठलीही शेती केली तर शेतावर मजूर हा दिसतो. मात्र, सुनील राऊत यांच्या शेतावर मजूर काम करीत नाहीत. पती, पत्नी वर्षा, मुलगा आणि मुलगी हे शेतात मिळेल त्या वेळेत जाऊन काम करतात. फळ बागेची छाटणी असो वा निंदन तसेच फळ तोडणी. ही सर्व कामे कुटुंबातील सर्व व्यक्ती करतात. त्यामुळे मजुरांवरील खर्चही त्यांचा वाचला आहे.

Last Updated : Feb 4, 2021, 9:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.