ETV Bharat / state

यवतमाळमध्ये सलग पाचव्या दिवशी बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ - यवतमाळ कोरोना अपडेट

यवतमाळमध्ये सलग पाचव्या दिवशी बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात 658 जण पॉझिटिव्ह तर 1085 जण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

fifth day in a row, the number of patients recovering in Yavatmal has increased
यवतमाळमध्ये सलग पाचव्या दिवशीबरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ
author img

By

Published : May 15, 2021, 7:45 PM IST

यवतमाळ - चालू आठवड्यात सलग पाचव्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गत दोन दिवसांपासून मृत्यूच्या आकड्यातही कमी आली असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 427ने जास्त आहे. जिल्ह्यात 658 जण पॉझेटिव्ह तर 1085 जण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सात तर एक मृत्यू खासगी रुग्णालयात झाल आहे.

यवतमाळमध्ये सलग पाचव्या दिवशीबरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ

पॉझिटिव्हीटी दर 12.84 -

सद्यस्थितीत जिल्ह्यात 5387 रुग्ण ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी रुग्णालयात भरती 2439 तर गृह विलगीकरणात 2948 रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 66475 झाली आहे. 24 तासात 1085 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 59503 आहे. जिल्ह्यात एकूण 1585 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 12.84, मृत्यूदर 2.38 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील 56 वर्षीय महिला व 77 वर्षीय पुरुष, नेर येथील 45 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 50 वर्षीय महिला, बाभुळगाव येथील 52 वर्षीय पुरुष आणि वणी येथील 65 वर्षीय पुरुषाचा आहे. खासगी रुग्णालयात यवतमाळ येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या 658 जणांमध्ये 410 पुरुष आणि 248 महिला आहेत. यात पांढरकवडा येथील 128 पॉझेटिव्ह रुग्ण, यवतमाळ 95, मारेगाव 75, वणी 67, दारव्हा 56, झरीजामणी 41, राळेगाव 28, आर्णि 25, बाभुळगाव 25, महागाव 22, पुसद 20, दिग्रस 17, उमरखेड 15, नेर 14, घाटंजी 13, कळंब 9 आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 517649 नमुने पाठविले असून यापैकी 514793 प्राप्त तर 2856 अप्राप्त आहेत. 448318 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

रुग्णालयात 949 बेड उपलब्ध -

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नऊ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 30 खासगी कोविड रुग्णालयांमध्ये एकूण 949 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 402 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 175 बेड शिल्लक, नऊ डीसीएचसीमध्ये एकूण 506 बेडपैकी 173 रुग्णांसाठी उपयोगात, 333 बेड शिल्लक आणि 30 खासगी कोविड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 658 उपयोगात तर 441 बेड शिल्लक आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.