यवतमाळ - खरीप हंगामाच्या पिक कर्जासाठी कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे शेतकऱ्यांची चांगली कसरत होत आहे. यातच बँकेकडून कुठलीच सुविधा मिळत नाही. शेतकऱ्यांना तासन् तास बँकेच्या बाहेर रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
बँकेकडून कुठलीच सुविधा नाही
आर्णी येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. बॅंकेकडून ग्राहकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाव्हती. कोरोना आहे, असे सांगत बॅंकेकडून मुख्य गेटवर एक कर्मचारी उभा करुन ग्राहकांना बाहेर थांबवून ठेवले जाते. एका-एका ग्राहकाला आवाज देऊन आतमध्ये पाठवले जात आहे.
यात बॅंकेसमोर असणारे ग्राहक जीव मुठीत धरुन उभे आहेत. पिककर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पुढारी, सामाजिक काम कणारी मंडळीही अशा अडचणीच्या प्रसंगी शेतकऱ्यांसाठी का समोर येत नाहीत? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.
हेही वाचा - आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या दालनाबाहेर नर्सचा गोंधळ