ETV Bharat / state

पाण्यातून वाट काढणं शेतकऱ्यांसाठी धोकादायक....वाघाडी नदीवर पूल बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी - yavatmal vaghadi river news

यवतमाळ तालुक्यातील पांढरी गावातील शेतकरी शेख कासम यांची वाघाडी नदी काठावर शेती आहे. 12 एकर शेतीतील 2 एकर क्षेत्रावर वांगे तसेच इतर भाजीपाला तर उर्वरित क्षेत्रात त्यांनी कपाशी लागवड केली आहे. नदी काठावर शेती असल्याने त्यांना नदीतील पाण्यातून वाट काढत शेतात जावे लागते. अशाप्रकरे नदी काठावरील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागात पूल बांधण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे.

Demand for construction of bridge over Waghadi river
पाण्यातून वाट काढताना शेतकऱ्यांचे होतआहेत हाल....वाघाडी नदीवर पूल बांधण्याची करताहेत मागणी
author img

By

Published : Jul 30, 2020, 1:31 PM IST

Updated : Jul 31, 2020, 5:28 PM IST

यवतमाळ - पांढरी गावात वाघाडी नदीवर पूल नसल्याने येथील ग्रामस्थांना नदी काठावरील शेतीत जाण्यासाठी पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. तसेच दरवर्षी पावसाळ्यात नदीला येणारा पूर बघता धोका पत्करून जावे लागत असल्याने या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पाण्यातून वाट काढताना शेतकऱ्यांचे होतआहेत हाल....वाघाडी नदीवर पूल बांधण्याची करताहेत मागणी

यवतमाळ तालुक्यातील पांढरी गावातील शेतकरी शेख कासम यांची वाघाडी नदी काठावर शेती आहे. 12 एकर शेतीतील 2 एकर क्षेत्रावर वांगे तसेच इतर भाजीपाला तर उर्वरित क्षेत्रात त्यांनी कपाशी लागवड केली आहे. नदी काठावर शेती असल्याने त्यांना नदीतील पाण्यातून वाट काढत शेतात जावे लागते. कधी डोक्यावर कधी खांद्यावर शेतीचे साहित्य न्यावे लागते. शेतातील उत्पन्न, बियाणे, खते, तसेच शेतीकामासाठी लागणारे साहित्य घेऊन जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर येत असताना असा धोका पत्करून शेतात जावे लागते. पावसाळ्यात नदीला मोठा पूर असला तर शेतात जाणे कठीण होते. उन्हाळ्यात लागवड केलेले वांग्याचे उत्पादन निघत असून वांगे तोडणीसाठी मजूर असे शेतापासून लांब असलेल्या आणि गाळण भागातुन येण्यास नकार देतात. तर दुसरीकडे नदी पार करतांना त्या सर्वांना पाण्यातून येताना सुद्धा धोका आहे असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशाप्रकरे नदी काठावरील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागात पूल बांधण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे.

हेही वाचा - वॉचमनच्या मुलीचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; भांडुपमधील भाग्यश्रीवर कौतुकाचा वर्षाव

Last Updated : Jul 31, 2020, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.