ETV Bharat / state

य़वतमाळमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू - यवतमाळ लाइव्ह

यवतमाळ जिल्ह्यातील वेडद येथील शेतकरी दिलीप गाळगे(52) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास पावसाची चाहूल लागताच मृतक दिलीप गाळगे यांनी मूग भिजू नये म्हणून त्यावर गोणी टाकून मूग झाकायला सुरुवात केली. त्याच वेळी अचानक दिलीप यांच्या अंगावर वीज पडली. व त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

yavatmal Farmer dies
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
author img

By

Published : May 7, 2021, 1:17 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील वेडद येथील शेतकरी दिलीप गाळगे(52) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. शेतात मुगाची गंजी झाकण्यासाठी गेले होते.

सायंकाळच्या सुमारास पाऊसाची चाहूल लागताच मृतक दिलीप गाळगे यांनी मूग भिजू नये म्हणून त्यावर गोणी झाकायला गेले होते. तर त्यांचा मित्र सतीश हे सोयाबीन झाकत होते. मात्र त्याच वेळी अचानक दिलीप यांच्या अंगावर वीज पडली. ही घटना झाल्याचे सतीश यांना माहितीच नव्हती. सोयाबीन झाकल्यावर सतीश हे दिलीप यांच्याजवळ गेले असता त्यांना दिलीप खाली पडलेले दिसले व त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती शेजारी व गावकऱ्यांना दिली.

शेतीवरच होता उदरनिर्वाह

त्यांच्याकडे 16 एकर शेती आहे. यात पीक घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होते. या संपूर्ण प्रकरणाची मुकुटबन पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी खुशाल सुरपाम, प्रवीण तालकोकुलवर यांनी पंचनामा केला. मृतक दिलीप यांच्या मागे पत्नी, 2 मुलं, विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.