ETV Bharat / state

विशेष : यवतमाळातील 'मांझी'ने २ वर्षं मेहनत करून खोदली ३० फूट खोल विहिर - यवतमाळ शेतकरी न्यूज

रामदास दिगंबर पिलावन, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो लोणबेहळ येथील रहिवासी असून लोणबेहळ ते शेंदुरसनी रोडवर गावालगत चार एकर जमीन आहे. आदिवासी शेतकर्‍यांसाठी शासनाच्या शेकडो योजना आहेत. मात्र, शेती कागदोपत्री एकत्र असल्याने त्यांना अल्पभूधारक योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे शेतात आतापर्यंत सरकारी योजनेमधून विहीर मिळू शकली नाही. कोरडवाहू शेती करण्यात काही अर्थ नाही, हे आर्थिक गणित त्यांना उमगले.

farmer couple di well yavatmal  yavatmal latest news  yavatmal farmers news  यवतमाळ लेटेस्ट न्यूज  यवतमाळ शेतकरी न्यूज  शेतकरी दाम्पत्याने खोदली विहिर यवतमाळ
यवतमाळातील 'मांझी'ने २ वर्ष मेहनत करून खोदली ३० फूट विहिर, दगडी शेतात घेताहेत भाजीपाल्याचे उत्पादन
author img

By

Published : Jun 8, 2020, 6:24 PM IST

Updated : Jun 25, 2020, 4:39 PM IST

यवतमाळ - जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असली की, अडचणींवर सहज मात करता येते. कोणत्याही योजनेचा लाभ नाही. त्यातही शेतजमीन खडकाळ आणि दगडी आहे. मात्र, यापैकी कोणत्याही कारणांचा पाढा न वाचता एका शेतकरी दाम्पत्याने दोन वर्षे घाम गाळून 30 फूट खोल विहीर खोदली. त्यांची मेहनत फळाला येऊन विहिरीला पाणीही लागले. आता अल्पभूधारक शेतकरी याच दगडी अन् खडकाळ जमिनीवर भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. ‘मांझी’ यांनी पत्नीच्या प्रेमापोटी पहाड खोदला तर, यवतमाळ जिल्ह्यातील लोणबेहळ येथील मांझीने संसार फुलविण्यासाठी विहीर खोदली.

यवतमाळातील 'मांझी'ने २ वर्ष मेहनत करून खोदली ३० फूट विहिर, दगडी शेतात घेताहेत भाजीपाल्याचे उत्पादन

रामदास दिगंबर पिलावन, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो लोणबेहळ येथील रहिवासी असून लोणबेहळ ते शेंदुरसनी रोडवर गावालगत वडिलोपार्जित आठ एकर जमीन आहे. त्यापैकी त्यांच्या वाट्याला चार एकर जमीन आली. आदिवासी शेतकर्‍यांसाठी शासनाच्या शेकडो योजना आहेत. मात्र, सर्व शेती कागदोपत्री एकत्र असल्याने त्यांना अल्पभूधारक योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे शेतात आतापर्यंत सरकारी योजनेमधून विहीर मिळू शकली नाही. कोरडवाहू शेती करण्यात काही अर्थ नाही, हे आर्थिक गणित त्यांना उमगले. त्यामुळे रामदास व त्यांच्या पत्नीने मिळून रात्रंदिवस एक करून दुसर्‍याच्या शेतात मजुरी केली. मजुरी करता-करता ते दररोज सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत आपल्या शेतात स्वत:च विहीर खोदायचे. सलग दोन वर्षं सातत्याने मेहनत घेऊन विहिरीचे खोदकाम ३० फुटांपर्यंत पूर्ण केले. त्यातच पाणी लागल्याने त्यांच्या मेहनतीला फळ आले. त्यानंतर त्यांनी त्याच शेतात असलेले संपूर्ण दगड, धोंडे वेचून घेतले. त्याच दगडाचा शेताला बांध करून माती भरली. दगडी शेतीला सुपीक बनवले. बघता-बघता पडीत जमिनीवर फळझाडे, भाजीपाला लागवड केली. आता याच दगडी शेतात त्यांना भरघोस उत्पन्न मिळते.

Last Updated : Jun 25, 2020, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.