यवतमाळ - पुसद नगरपालिकेअंतर्गत बांधकाम विभागातील नालीच्या बांधकामांचे बिले काढून घेण्यासाठी १४ हजार रुपयाची लाच अभियंत्याला १४ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. अश्विन रामेश्वर चव्हाण (31, अभियंता श्रेणी-3) असे लाच स्वीकारणाऱ्या लोकसेवकाचे नाव आहे.
अभियंत्याने केली पैशाची मागणी
नगरपालिकेच्या बांधकाम विभागाअंतर्गत काँक्रिट नालीच्या बांधकामाचा कंत्राट वसंत नगर येथे राहणाऱ्या एका 45 वर्षीय ठेकेदाराला देण्यात आले होता. बांधकाम विभागामार्फत या ठेकेदाराला बांधकामाचे टप्प्या-टप्प्याने पैसे दिले जात होते. मात्र नगरपालिकेमार्फत काम थांबल्याने काही बिले काढून देण्यासाठी बांधकाम विभागाच्या चकरा मारण्याची वेळ त्या ठेकेदावर आली. बिले तात्काळ काढण्यासाठी नगर पालिकेच्या बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता अश्विन चव्हाण यांनी बिले काढण्याच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली होती.
ठेकेदाराने केली तक्रार
बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता लाचेची मागणी करत असल्यास बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिनांक 18 मेला केली होती. ठरल्याप्रमाणे त्या ठेकेदाराला स्थापत्य अभियंत्याने नगरपालिकेलगत असलेल्या पुरुष प्रसाधनगृहाजवळ 14 हजार रुपये घेऊन येण्याचे ठरले. त्यानुसार त्या ठेकेदाराने 14 हजार रुपयांची रक्कम स्थापत्य अभियंता अश्विन चव्हाण यांना देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या लोकसेवकाला रंगेहात पकडले. या आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.
नगर पालिकेच्या अभियंत्याला चौदा हजारांची लाच घेताना अटक - pusad muncipal corporation news
नगरपालिकेच्या बांधकाम विभागाअंतर्गत काँक्रीट नालीच्या बांधकामाचा ठेकेदाराला देण्यात आले होते. यासंदर्भात बिले तत्काळ काढण्यासाठी नगर पालिकेच्या बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता अश्विन चव्हाण यांनी बिले काढण्याच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली होती.