यवतमाळ - यंदाही कोरोना निर्बंधांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या मूर्तीची स्थापना करावी. हा संस्कार बाल मनावर पडावा आणि अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित व्हावे, या हेतूने उमरखेड नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने महात्मा बसवेश्वर संस्थान मध्ये आयोजित "चला बनवूया मातीचे गणराया" या स्पर्धेत अनेक बाल कलाकारांनी एकाहून एक सुंदर अशा मातीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
बाल कलाकारांनी मातीपासून घडविल्या गणेश मूर्ती, पर्यावरणपूरक उत्सवाचा दिला संदेश
गणेश उत्सव काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण होऊन नैसर्गिक जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या किंवा शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना केल्यास पर्यावरण रक्षणाला आपण फार मोठा हातभार लावता येऊ शकतो.