यवतमाळ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या कडक निर्बंधांमध्ये दारूची दुकाने बंद आहेत. दारूची लत भागविण्यासाठी सॅनिटायझर पिल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना वणी येथे घडली आहे. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश शेलार, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी पाच मृत व्यक्तींची नावे आहेत. यातील दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले.
काल दोघांचा तर आज तिघांचा मृत्यू
काल सायंकाळी दोन व्यक्तींचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला होता. तर रात्रीतून आणखी तिघांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सॅनिटायझर पिऊन मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आता पाच झाली आहे. वणी शहरातील तेली फैलमधील दत्ता लांजेवार (वय 47) यांनी रात्री 9 च्या सुमारास आपली दारूची लत भागविण्यासाठी सॅनिटायझर पिले आणि नंतर घरी आल्यावर रात्री दहा वाजता त्याच्या छातीत त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर असह्य वेदना होत असल्याने दत्ताला वणी ग्रामीण रुग्णालयात भर्ती करण्यात आले. तिथे रात्री 11 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच नूतन पाथरकर (वय 33) याचाही सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाला आहे. त्याने रात्री सॅनिटायझर पिले आणि नंतर त्याला त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तिथून तो घरी निघून आला आणि पहाटे त्याचा मृत्यू झाला. तसेच वणीच्या एकतानगर येथील संतोष मेहर याने सुद्धा सॅनिटायझर पिल्याने पहाटे 3.30 वाजता घरीच मृत्यू झाला. तसेच एकतानगरजवळ ढकल ठेला चालवून उदरनिर्वाह करणारा गणेश शेलार आणि सुनील ढेंगळे यांचा सुद्धा रात्री सॅनिटायझ पिल्याने घरीच मृत्यू झाला.
दारू मिळेना म्हणून प्यायले सॅनिटाझर; यवतमाळमध्ये पाच जणांचा मृत्यू - यवतमाळ सॅनिटाझर प्यायल्याने मृत्यू
मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून मृतांच्या नातलगांनी सॅनिटायझर पिल्याने त्यांना त्रास सुरू झाला आणि त्यामुळे मृत्यू झाला अशी, माहिती वणी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना दिली. सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाल्याच्या बाबीचा वणी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी दुजोरा दिला आहे.