ETV Bharat / state

'ती' कोरोनाबाधितांचे वाढवतेय मनोबल, आयसोलेशन वार्डमध्ये देतेय योगाचे धडे

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना वाळीत टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवल्याचे प्रकारही समोर आले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील त्या रुग्णाकडे आणि त्याच्या कुटुंबीयांकडे संशयाच्या नजरेने बघितले जाते. मात्र, त्यांना आपुलकीची गरज आहे. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी डॉ. टीना राठोड पुढे आल्या आहेत.

yoga training to corona patients  yavatmal latest news  yavatmal corona update  dr. teena rathod news yavatmal  कोरोनाबाधितांना योगा प्रशिक्षण यवतमाळ  यवतमाळ लेटेस्ट न्युज  यवतमाळ कोरोना अपडेट
'ती' कोरोनाबाधितांचे वाढवतेय मनोबल, आयसोलेशन वार्डमध्ये देतेय योगाचे धडे
author img

By

Published : Jun 4, 2020, 5:08 PM IST

Updated : Jun 25, 2020, 5:08 PM IST

यवतमाळ - कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची मन:स्थिती ढासळलेली असते. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम यवतमाळमधील एक डॉक्टर तरुणी करत आहे. डॉ. टीना राठोड, असे तिचे नाव असून जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये जाऊन ती रुग्णांना योगाचे धडे देत आहे. त्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढून ते लवकर कोरोनावर मात करत असल्याचे दिसून येत आहे.

'ती' कोरोनाबाधितांचे वाढवतेय मनोबल, आयसोलेशन वार्डमध्ये देतेय योगाचे धडे

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना वाळीत टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवल्याचे प्रकारही समोर आले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील त्या रुग्णाकडे आणि त्याच्या कुटुंबीयांकडे संशयाच्या नजरेने बघितले जाते. मात्र, त्यांना आपुलकीची गरज आहे, असे डॉ. टीना म्हणाल्या. गेल्या दीड महिन्यांपासून अशा कोरोनाबाधित रुग्णांना आयसोलेशन वार्डात जाऊन मानसिक बळ देण्याचे काम डॉ. टीना करत आहेत.

कोरोनाबाधित व्यक्ती मनातून खचलेले असतात. त्यामुळे कोरोनाला घाबरून जाऊ नका, त्याच्याशी लढा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी योगा, मेडिटेशन, विविध प्रकारच्या मुद्रा त्या रुग्णांना करायला सांगतात. त्याप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्ण देखील योगा करत असतात. त्याचा सकारात्मक परिणाम होत असून आतापर्यंत 80 ते 90 टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. डॉ. टीना राठोड यांनी पुढे येऊन समाजाप्रती आपली जबाबदारी स्वीकारली. अशाच प्रकारे इतर नागरिकांनी देखील आपली जबाबदारी पार पाडल्यास कोरोनासारख्या संकटावर नक्कीच लवकर मात करता येऊ शकते.

Last Updated : Jun 25, 2020, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.