ETV Bharat / state

पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचे आंदोलन; संदिपान भुमरेंना केले लक्ष - yewatmal dixtrict

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये पिकांसह, घारांचेही अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून कोणतीही भरपाई अजुनपर्यंत मिळाली नाही. त्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्री संदिपान भुमरे यांना लक्ष केले आहे.

पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचे आंदोलन

author img

By

Published : Oct 1, 2021, 7:20 AM IST

यवतमाळ - सततच्या पावसाने कपाशी, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठलाही पंचनामा न करता जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, ही मागणी घेऊन आज यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी खात्यात जमा झाली पाहिजे, अन्यथा पालकमंत्री संदिपन भुमरे यांना दिवाळी साजरी करू देणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.

पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचे आंदोलन

'कुठलही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही'

राज्यात तीन पक्षाचे सरकार सत्तेत आहे. मात्र, आता शेतकऱ्यांना जाणीव झाली आहे कुठल्याही पक्षाचे सरकार असो हे शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही. केवळ शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सोंग हे सत्ताधारी पक्षाचे नेते करत आहेत. खर्‍या अर्थाने सत्ताधारी हे शेतकऱ्यांचे भूमिपुत्र असाल आणि शेतकऱ्यांची मुलं म्हणून निवडून गेलेले आहात. तरर नुकसानीचे पंचनामे न करता तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

'शेतातील पिके पाण्याखाली'

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि इसापूर धरणाचे पूर्ण दरवाजे उघडल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांनच्या शेतात पाणी साचले आहे. उभे पीक उध्वस्त झाले आहे. आणि या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाची तात्काळ मदत मिळावी अशी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आता शेतकऱ्यांचे गाई म्हशी आणि जनावरे शासनाने सांभाळावी अशी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी करीत आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोकोमुळे उमरखेड- यवतमाळ या मार्गावरील वाहतूक साधारण तीन तास विस्कळीत झाली होती.

हेही वाचा - राज्यात अतिवृष्टीमुळे १७ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान, विजय वडेट्टीवार यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.