यवतमाळ - कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी यवतमाळकर एकसाथ पुढे सरसावले आहेत. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज(सोमवार) जिल्हाधिकारी एमडी सिंग यांनी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी शहरातील दर्डा नगर, आर्णीरोड, लोहारा, दाते कॉलेज रोड, बसस्थानक, वाघापूर, जयविजय चौक, कळंब चौक अशा विविध भागात पेट्रोलिंग करून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले.
या संचारबंधीमुळे शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे. तर, पोलीस शहरात गस्त घालून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहेत.
हेही वाचा - जनतेचा जनतेसाठी 'जनता कर्फ्यू'; यवतमाळकरांची पूर्ण साथ
हेही वाचा - अवैद्य रेती वाहतुकीचे तीन बळी; आर्णी-दिग्रस रस्त्यावरील लाख फाट्याजवळील घटना