यवतमाळ - मारेगांव, तालुक्यातील मार्डी फिसकी जंगलाच्या शिवारात सायंकाळच्या दरम्यान घराकडे परत येत असताना वाघाने हल्ला करून गायीला ठार केले.
किन्हाळा येथे विठ्ठल सिडाने गावातील काही गायी चरायला नेल्या होत्या. जनावरांने चरवून घराकडे परत येत असताना जनावरांच्या मागावर असलेल्या पट्टेदार वाघाने आडे यांच्या गाईला हल्ला चढवत ठार केले. सगळे अचानक घडल्याने गुराखी व जनावरे सैरावैरा होऊन पळू लागला. गुराखी घाबरलेल्या अवस्थेत गावात येऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
हेही वाचा - 'टी-वन' वाघीण ठार घटनेची वर्षपूर्ती; नवाब पिता-पुत्रांचा ग्रामस्थांकडून सत्कार
या परिसराला लागून टिपेश्वर अभयारण्य आहे. मागील वर्षीपूर्वी टी 1 वाघीनीला ठार करण्यात आले होते. तर तिचा एक बछडा जेरबंद करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, पुन्हा वाघाचे हल्ला होत असल्याने या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मजूर वर्ग व शेतकरी शेतामध्ये जायला घाबरत आहेत.
हेही वाचा - #CAA Protest : यवतमाळात मुस्लीम बांधवांचा मोर्चा; विधेयक रद्द करण्याची मागणी