यवतमाळ - जंगलात चराईसाठी गेलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला, या हल्ल्यात गाय आणि बैलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजुर येथील जंगलात घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा - ११८ मुलींना परिवहन विभागात सामील करून घेणार - दिवाकर रावते
गुराख्याने जनावरांना चारण्याकरीता राजुर येथील जंगलात नेले होते. यामध्ये सुखदेव नागोसे (रा. कात्री, ता. कळंब) यांचा बैल आणि प्रभाकर झलके (रा. कात्री, ता. कळंब) यांची गाय या दोन्ही पाळीव प्राण्यांवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. यामुळे परिसरात वाघ असल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वाघाचा तसेच अन्य वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा - रत्नागिरीत विहिरीत बुडून २ जणांचा मृत्यू
कळंब परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. यापूर्वी या भागात वाघाचा वावर होता. तसेच या तालुक्यालगत घाटंजी तालुक्यातही जंगल आणि त्याला लागून टिपेश्वर अभयारण्य आहे. यात जपळपास 20 वाघांचा संचार आहे.